मुंबई: अभिनेता सिद्धार्थ चांदेकर यानं मुंबई पोलिस,महाराष्ट्र सरकार पुणे पोलिस यांचे आभार मानन्यासाठी आणि त्यांच्या कामाचं कौतुक करण्यासाठी एक ट्विट केलं होते. या ट्विटची चर्चा झाल्यानंतर यावरून आता राजकारण देखील सुरू झालं आहे.

सिद्धार्थनं ट्विट केल्यानंतर एका युजरनं त्याच्या ट्विटला उत्तर देताना राज्यातील आणि मुंबईतील करोना रुग्णाच्या संख्येची आठवण करून दिली. आणि तु त्यांच्या कामाला का सलाम करतोयअसा प्रश्न विचारला. या युजरच्या या ट्विटला उत्तर न देता सिद्धार्थनं त्याला ‘ तुला करोना झालाय का?’,असा थेट प्रश्न विचारला. या सर्व ट्विटरवॉरमध्ये भाजपच्या आयटी सेलच्या कार्यकर्त्यानंही उडी घेत सिद्धार्थवर चांगलीच टीका केली आहे.

‘सिद्धार्थ चांदेकर या अभिनेत्याला संपूर्ण महाराष्ट्रानं आणि मराठी माणसानंडोक्यावर घेतलं परंतु सिद्धार्थ चांदेकरला खरे आकडे सांगितले तर लगेच समोरच्याला ‘कोरोना झाला का म्हणून हिणवणे?’ हे कितपत योग्य? असा प्रश्न भाजपच्या आयटी सेलच्या कार्यकर्त्यानं सिद्धार्थला विचाराला. त्यानंतर अभिनेते स्वत:ला समजतात कोण? माणुसकी नावाचा प्रकार असतो का यांच्यात असं म्हणत टीका देखील केली आहे.इतकंच नाही तर पुन्हा असले फालतू ट्विट करू नकोस असा सल्लाही सिद्धार्थला देण्यात आला. या ट्विटर वॉरनंतर आपली चूक मान्य करत सिद्धार्थनं माफी मागितली असली तरीआपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या, असंही सिद्धार्थनं शेवटी म्हटलं आहे.
वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here