मुंबई/ नवी दिल्ली: शिवसेना खासदार संजय राऊत आणि भाजप नेत्यांमधील शाब्दिक चकमक सुरुच आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नुकतेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यशैलीचं कौतुक करतानाच, शिवसेनेसह काँग्रेसला डिवचलं होतं. त्याला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. भाजप नेत्यांचं अजित पवारांबद्दलचं प्रेम पुतणा मावशीचं आहे, असं राऊत म्हणाले.

महाविकास आघाडीचं सरकार राष्ट्रवादी काँग्रेस चालवतं. काँग्रेस आणि शिवसेनेचे मंत्री फक्त वाहने फिरवतात, अशी खिल्ली भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उडवली होती. याबाबत शिवसेना खासदार संजय राऊत यांना प्रसारमाध्यमांनी विचारलं असता, त्यांनी चंद्रकांत पाटील यांना जोरदार टोला लगावला. ‘आम्ही सुद्धा नितीन गडकरी यांचं कौतुक करतो. कारण गडकरी हे उत्तम काम करत आहेत. त्यामुळे मंत्री म्हणून त्यांचं कौतुक करतो,’ असं राऊत म्हणाले. भाजपमध्येही कौतुक करण्यासारखी काही माणसं आहेत. त्यांचं कौतुक व्हायलाच हवं. राजकारणाच्या पलीकडेही काही विषय असतात. आता भाजपच्या लोकांना अजित पवारांविषयी जे प्रेम आहे, ते पुतणा-मावशीचं आहे, असा टोलाही राऊत यांनी यावेळी लगावला.

सगळी सत्ता राष्ट्रवादी चालवते, काँग्रेस आणि शिवसेनेचे मंत्री फक्त…; चंद्रकांत पाटलांनी पुन्हा डिवचलं
nana patole : ‘काँग्रेस वऱ्हाडी नव्हे, तर काँग्रेस बाप आहे, बापच राहणार’, नाना पटोलेंचं सणसणीत उत्तर

काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील?

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक होऊ घातली आहे. भाजपनं सत्यजित कदम यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या प्रचारासाठी कोल्हापुरातील रंकाळा उद्यान येथे चाय पे चर्चा हा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना, राज्य सरकार राष्ट्रवादी काँग्रेस चालवतं असं सांगून, त्यांनी अजित पवार यांच्या कार्यशैलीचं कौतुक केलं होतं. सरकार राष्ट्रवादी काँग्रेस चालवतं. काँग्रेस आणि शिवसेनेचे मंत्री फक्त वाहने चालवतात, अशी खिल्ली पाटील यांनी उडवली होती.

‘…ते कोणत्याही थराला जाऊ शकतात’; राऊत यांचा भाजपच्या दोन नेत्यांवर घणाघात!

46 COMMENTS

  1. buying prescription drugs in mexico [url=https://mexicanpharmacy.guru/#]mexico drug stores pharmacies[/url] reputable mexican pharmacies online

  2. canadian pharmacy online [url=http://certifiedcanadapills.pro/#]canadian pharmacy reviews[/url] canadian 24 hour pharmacy

  3. where can i get generic mobic pill [url=https://mobic.store/#]where buy mobic pill[/url] how to get generic mobic without a prescription

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here