मुंबई: बॉलिवूड आणि क्रिकेट क्षेत्रातील सेलिब्रिटी एकमेकांचे चांगले मित्र आहेत. तसंच राजकीय नेत्यांचे देखील बॉलिवूडमधील मोठ्या कलाकारांचे जवळचे संबंध असल्याचं अनेकदा दिसून आलंय. परंतु राजकीय नेत्यांच्या मुलांचे फोटो अभिनेत्रींसोबत पाहायला मिळाल्यास अनेकदा चर्चा होते. असाच एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा फोटो व्हायरल झाल्यानंतर चर्चा होणं सहाजिक होतं.

राज्याच्या राजकारणातील बड्या नेत्याचा हा मुलगा असून एका बॉलिवूड अभिनेत्री सोबतचा फोटो व्हायरल झालाय. पवार कुटुंबियांचे कपूर कुटुंबियांसोबतचे स्नेह सर्वांनाच ठाऊक आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे पुत्र जय पवार यांचा फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोत त्यांच्यासोबत असणारी अभिनेत्री आहे उर्वशी रौतेला. जय आणि उर्वशी यांचा फोटो व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे.
बाबो ! उर्वशी रौतेला हिने तोडले सर्व रेकॉर्ड, घातला इतका महाग ड्रेस
व्हायरल झालेला हा फोटो जुना असून नेमका कधी क्लिक केला हे स्पष्ट होत नाहीए. पंरतु एका पार्टीदरम्यानचा हा फोटो आहे. या फोटोत जय आणि उर्वशी यांच्यासोबत आणखी एक व्यक्ती देखील दिसत आहे. अनेक सोशल मीडियावर पेजेस वर हा फोटो दुबईतील बुर्ज-अल-अरब इथला असल्याचा दावा केला गेलाय. पंरतु याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती नाहीए.

उर्वशीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तिच्याकडं सध्या नवीन प्रोजेक्ट्सच्या रांगा आहेत. ती लवकरच जिओ स्टुडिओजच्या वेब सीरिज ‘इन्स्पेक्टर अविनाश’ मध्ये रणदीप हुड्डासोबत काम करताना दिसणार आहे. यासोबतच ती द्विभाषिक थ्रिलर ‘ब्लॅक रोझ’ तसेच ‘थिरुत्तू पायले २’ च्या हिंदी रिमेकमध्ये मुख्य भूमिका साकारणार आहे.

याशिवाय उर्वशीला साऊथमधूनही अनेक ऑफर आल्या आहेत. ज्यामध्ये ती ‘द लीजेंड ऑफ २०० कोटी’ या बिग बजेट चित्रपटातून सरवणासह तमिळमध्ये पदार्पण करणार आहे. अभिनेत्रीने कठोर परिश्रम आणि एकाग्रतेने बॉलिवूड तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वत:साठी एक जागा तयार केली आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here