मुलुंड : एका इलेक्ट्रीशियननं फ्लॅटमध्ये कपाटावर ठेवलेल्या बॅगेतील सोन्याचे दागिने लंपास केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. संशयित आरोपी हा वायरिंगचं काम करण्यासाठी आला होता. मुलुंडच्या टाटा कॉलनीमध्ये ही घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, मुलुंडच्या टाटा कॉलनीत हा प्रकार घडला. येथील एका इमारतीमधील फ्लॅटमध्ये वायरिंगचं काम करण्यासाठी इलेक्ट्रीशियन आला होता. त्यावेळी त्यानं बॅगेतील सोन्याचे दागिने लंपास केले. या दागिन्यांची किंमत अंदाजे साडेवीस लाख रुपये आहे.

Thane Crime News : ठाणे जिल्हा हादरला, ७० वर्षीय दोन महिलांवर तरूणाने केला बलात्कार

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रविकांत विश्वकर्मा असं या आरोपीचं नाव आहे. तो मुलुंडच्या टाटा कॉलनीमध्ये राहणाऱ्या रविकिरण नाईक यांच्या घरी वायरिंगचं काम करण्यासाठी आला होता. त्यावेळी फ्लॅटमध्ये कपाटावर ठेवलेल्या बॅगवर त्याची नजर पडली. फ्लॅटमध्ये काम करणाऱ्या इतर कामगारांची नजर चुकवून त्याने ती बॅग लंपास केली. आपल्यावर पोलिसांचा संशय येऊ नये, यासाठी त्याने बॅगमधील काही दागिने हे दुसऱ्या कामगाराच्या बॅगमध्ये लपवले. रविकिरण यांना घरामध्ये बॅग दिसली नाही. त्यावेळी त्यांनी नवघर पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दिली. पोलिसांनी घरात नुतनीकरणाचे काम करणाऱ्या १२ कामगारांची झाडाझडती घेतली. रविकांत याच्यावर पोलिसांचा संशय बळावला. त्यांनी पोलिसी खाक्या दाखवताच त्यानं गुन्ह्याची कबुली दिली. दागिने चोरले आणि संशय येऊ नये यासाठी दुसऱ्या कामगाराच्या बॅगमध्ये काही दागिने लपवले, अशी कबुली आरोपीनं दिली. पोलिसांनी त्याच्याकडून सोन्याच्या बांगड्या, मंगळसूत्र, चेन असा एकूण २० लाख ४५ हजार रुपये किंमतीचा ऐवज हस्तगत केला.

Thane : इमारतीच्या टेरेसवरील पाण्याच्या टाकीत २ कामगारांचा गुदमरून मृत्यू
धक्कादायक! बादलीमध्ये सापडले आठ कान, मानवी डोके, हात; १५ वर्ष बंद गाळ्यात नेमकं काय घडलं?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here