parbhani news today live: खळबळजनक! एकाच घरात पतीची आत्महत्या तर पलंगावर होता पत्नीचा मृतदेह – parbhani news today husband suicide and wife body found in house
परभणी : परभणीच्या सेलू शहरातील राजवी गांधी नगरमध्ये गळफास घेऊन पतीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. इतकंच नाहीतर त्याच खोलीत पत्नीचा पलंगावर मृतदेह आढळून आला. यामुळे शहरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू असल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अर्जुन गणेश आवटे, प्रियंका आवटे असे मयत पती-पत्नीचे नाव आहे. सेलू शहरातील राजीव गांधी नगर अर्जुन आवटे याचा तीन वर्षांपूर्वीच प्रियंकाशी विवाह झाला होता. आवटे पती-पत्नी एका खोलीत रविवारी राहत्या घरी झोपले होते. सोमवारी सकाळी ७ वाजले तरी दोघेही झोपेतून उठले नसल्याने अर्जुन यांच्या बहिणीने रूमची कडी वाजवली मात्र ते बाहेर आले नाहीत. हा प्रकार अर्जुनच्या बहिणीने वडिलांना सांगितला. धक्कादायक! बादलीमध्ये सापडले आठ कान, मानवी डोके, हात; १५ वर्ष बंद गाळ्यात नेमकं काय घडलं? यानंतर दरवाजा तोडून पाहिले असता अर्जुन याने लोंखडी पत्राला नायलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली तर पत्नी प्रियंका आवटे हिचा मृतदेह याच खोलीमध्ये पलंगावर झोपलेल्या अवस्थेत आढळून आला. दरम्यान, सदरील घटनेमुळे सेलू शहरामध्ये एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक रावसाहेब गाडेवाड यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी सेलू उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले आहेत.