मुंबई: मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) समाजसेवा शाखेच्या पथकाने सोमवारी पहाटे एका बारवर छापा मारला. या बारमधून २७ जणांना अटक करण्यात आली. तर १२ महिलांची सुटका करण्यात आली. समाजसेवा शाखेच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, बारमध्ये अश्लील नृत्य आणि गैरकृत्ये सुरू असल्याची माहिती समाजसेवा शाखेच्या पथकाला मिळाली होती. याबाबत खात्री पटल्यानंतर पथकाने छापेमारी केली. बारमध्ये केवळ ओळखीतील लोकांनाच प्रवेश दिला जात होता, अशीही माहिती मिळाली होती. या छापेमारीत बारमधून २७ जणांना अटक केली. तर १२ महिलांची सुटका केली. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Mumbai Murder : प्रेयसीनं लग्नाला दिला नकार, प्रियकरानं तिच्या ७ महिन्यांच्या भावाचा घेतला जीव
Mumbai : फ्लॅटमध्ये कपाटावरील बॅग बघून इलेक्ट्रीशियनची नियत फिरली, पण…

मागील आठवड्याच्या सुरुवातीला मुंबईच्या मालाड परिसरात एका बारमध्ये छापा मारला होता. त्यावेळी जवळपास ३० जणांना अटक केली होती. तर २५ महिलांची सुटका करण्यात आली होती. शहर गुन्हे शाखेच्या समाजसेवा शाखेने ही कारवाई केली होती.

Thane Crime News : ठाणे जिल्हा हादरला, ७० वर्षीय दोन महिलांवर तरूणाने केला बलात्कार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here