मेक्सिको : मेक्सिकोमधील एका शहरात झालेल्या गोळीबारात १९ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. रविवारी हा गोळीबार (Mexico Firing) झाला असून मृतांमध्ये १६ पुरुष आणि तीन महिलांचा समावेश असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. मिचोआकन राज्यातील लास टिनासास शहरात झालेल्या या गोळीबारामागील कारण अद्याप समजू शकलेलं नाही.

मेक्सिकोमध्ये ड्रग्स आणि इंधन तस्करीवरून अनेकदा गुन्हेगारी टोळ्यांमध्ये वाद होतो. या वादातूनच यापूर्वीही बऱ्याचदा गोळीबाराच्या घटना घडल्या आहेत. अशातच रविवारी पुन्हा एकदा लास टिनासास शहर गोळीबाराने हादरलं. एका सणानिमित्त लोक जमलेले असतानाच अचानक गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात एकूण १९ जणांनी आपला जीव गमावला. तसंच काही जण जखमी झाल्याची माहिती आहे. या जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

China Lockdown : चीनमध्ये पुन्हा करोनाचं थैमान: कडक लॉकडाऊनची घोषणा

दरम्यान, मिचोआकन हे राज्य नेहमीच तिथे घडणाऱ्या हिंसेच्या घटनांमुळे चर्चेत असते. मेक्सिकोमध्ये गँगवॉरला आवर घालण्यासाठी पोलिसांनी आतापर्यंत अनेकदा मोहीम राबवली. मात्र अजूनही हा हिंसाचार रोखण्यात पोलिसांना यश आलं नसल्याचं या नव्या घटनेनंतर स्पष्ट झालं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here