सोलापूर न्यूज लाईव्ह: ‘राष्ट्रवादीकडून अपमानच होणार असेल तर वेगळा विचार करा’, शिवसेना आमदाराची उद्धव ठाकरेंकडे मागणी – shivsena mla demand to uddhav thackeray solapur news today
सोलापूर : अर्थसंकल्पातील विकासनिधींच्या विषम वाटणीतून शिवसेनेतील खदखद आज बाहेर पडली. शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांनी आज महाविकास आघाडीतले मित्र पक्ष राष्ट्रवादी आणि काँग्रेसवर हल्लाबोल करत आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली. त्यामुळे सावंत यांचं हे वक्तव्य शिवसेना आमदारांच्या प्रातिनिधिक भावना असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
युवा सेनेचे वरिष्ठ नेते वरुन सरदेसाई यांच्या उपस्थितीत सोलापूरात सोमवारी युवा सेनेचा पदाधिकारी संवाद मेळावा पार पडला. या मेळाव्यात बोलताना आमदार सावंत यांनी हे वक्तव्य केलं आहे. ‘शिवसेनेला दुय्यम वागणूक मिळते, अर्थसंकल्पमध्ये देखील हेच दिसून आलं आहे. ६०-६५ टक्के बजेट राष्ट्रवादीला, ३० ते ३५ काँग्रेसला, उरलेल्या १६ टक्क्यातहीही पगार काढावे लागतात. विकास कामाला केवळ १० टक्के मिळतात. राष्ट्रवादीचे साधे ग्रामपंचायत सदस्य कोटी रुपयांचा निधी आणतो आणि आमच्या छातीवर नाचतो अन् आम्हाला केवळ गोड बोललं जातं’ अशा शब्दांत सावंत यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. aaditya thackeray: केवळ ‘या’च आमदारांना मिळणार म्हाडाची घरे?; आदित्य ठाकरेंनी केले स्पष्ट ते पुढे म्हणाले की, ‘आम्ही केवळ आदेशाची वाट बघतोय, जोपर्यंत सहन होईल तोवर सहन करु’ असा सूचक इशाराही सावंत यांनी भाजप पेक्षा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी आणि काँग्रेसला दिला आहे. मागील अडीच वर्षात राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांनी शिवसेसैनिकांना फोडल्याचे अनेक दाखले देत सावंत यांनी आपल्या पक्षावरील जणू अन्यायाचा पाढाचं यांनी वाचला.
‘ही सत्ता तुम्ही स्वप्नात तर पहिली होती का? ज्यांनी तुम्हाला सत्ता अनुभवायला दिली, तुम्ही त्यावरच अन्याय करता. एकमेकांचे कार्यकर्ते फोडू नये असे ठरलेलं असताना का असं होतं? आमच्या नादाला लागू नाका, तुम्ही शंभर मारले आणि आमचा एकच दणका बसला तर आईचे दूध आठवेल. मागील अडीच वर्षात झाला तसा केवळ अपमानचं होणार असेल तर साहेब वेगळा विचार करायला हवा’ अशी आर्जवही आमदार तानाजी सावंत यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना उद्देशून केलं आहे.
‘सत्तेत सोबत आहात ना? मग आमच्यावर कशाला वार करता? केवळ स्टेजवर बोलण्याचे विरोधक आहेत का ते? आतून तुमची सेटिंग आहे का? त्यांच्या ग्रामपंचायत सदस्य कोटी रुपये आणतो आणि आम्हाला काय? शिवभोजन थाळी चालवा, महिन्याचे बिल यायची वाट बघा. भाजपसोबत सत्तेत असतानादेखील आमच्यासोबत हेच होतं होतं, आताही हेच होतं आहे’ अशी खंतही सावंत यांनी बोलून दाखवली.