Ajit Pawar| यशवंत जाधव यांच्या डायरीतील मातोश्रीचा उल्लेख सध्या राज्यात चर्चेचा विषय ठरत आहे. रत्नागिरी दौऱ्यावर असलेल्या अजित पवार यांना याविषयी प्रतिक्रिया विचारण्यात आली.

हायलाइट्स:
- बरेच जण त्यांच्या आईला मातोश्री म्हणतात
- यशवंत जाधव त्यांच्या आईचा उल्लेख मातोश्री असा करत असतील
यावेळी अजित पवार यांनी हा विषय फारसा वाढवण्याची गरज नसल्याचे मत व्यक्त केले. यशवंत जाधव यांच्या डायरीत मातोश्री असा उल्लेख आला आहे. आता केंद्रीय तपास यंत्रणा त्यांचे काम करतील. यशवंत जाधव यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे. बरेच जण त्यांच्या आईला मातोश्री म्हणतात. त्याप्रमाणेच यशवंत जाधव त्यांच्या आईचा उल्लेख मातोश्री असा करत असतील. यशवंत जाधव यांनी ही बाब स्पष्ट करूनही या विषयाला पुन्हा पुन्हा का उकळी दिली जात आहे, असे अजित पवार यांनी म्हटले.
यशवंत जाधव यांच्या खासगी डायरीत नेमकं काय लिहलंय?
प्राप्तीकर खात्याने यशवंत जाधव यांच्या घरी छापा टाकला तेव्हा तपास मोहिमेत संशयित कागदपत्रे आणि डिजिटल पुरावेदेखील सापडले होते. यापैकी एका डायरीतील माहितीचा वेगळ्या पद्धतीने कसून तपास सुरू आहे. ‘मातोश्री’ या नावे दोन कोटी रुपये व ५० लाख रुपयांचे घड्याळ देऊ केले, अशी नोंद जाधव यांच्या खासगी डायरीत प्राप्तिकर विभागाला आढळली. ‘मातोश्री’ या आपल्या आई असल्याचा दावा यशवंत जाधव यांनी केला असला तरी दोन कोटी रुपयांची रोख आली कुठून आणि ती गेली कुठे? याची उकल प्राप्तिकर विभाग करत आहे.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
या बातम्यांबद्दल अधिक वाचा
Marathi News from Maharashtra Times, TIL Network
Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times