झोजिला, काश्मीर :

काश्मीरमध्ये सुरू असलेल्या प्रचंड बर्फवृष्टीतही श्रीनगर ते लेह लडाख मार्गावर उभारण्यात येणाऱ्या ‘झोजिला’ बोगद्याचं काम पूर्णत्वाकडे वाटचाल करतंय. झोजिला बोगद्यामुळे लेह-लडाखचा भाग उर्वरीत भारताशी बारामाही रस्ते मार्गाने जोडला जाणार आहे, त्यामुळे या बोगद्याला प्रचंड महत्त्व प्राप्त झालंय. हा ‘सिल्क रूट’ भारतीय लष्करासाठी धोरणात्मकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण सोनमार्ग ते मीनामार्ग हा प्रवास कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण करण्यासाठी आता ४ तासांऐवजी केवळ ४० मिनिटे पुरेशी ठरणार आहेत.

आव्हानात्मक प्रकल्प

२,७०० मीटर ते ३,३०० मीटर उंचीवर स्थित या भागात किमान तापमान उणे ४० अंश इतके कमी असतं. त्यामुळे हा भाग बऱ्याचदा बर्फाच्छादित असतो. त्यामुळे या बोगद्याचं काम अतिशय आव्हानात्मक ठरतंय. या मार्गावर वाहणाऱ्या नदी ओलांडण्यासाठी एकूण चार पूल बांधले जात असून, त्यांची एकूण लांबी ८१५ मीटर आहे.

Zojila Tunnel

काश्मीरमधल्या प्रचंड बर्फवृष्टीतही ‘झोजिला’ बोगद्याची पूर्णत्वाकडे वाटचाल

या प्रकल्पांतर्गत १७ किमी लांबीचा रस्ता, तीन उभ्या शाफ्ट, चार पूल आणि इतर संबंधित बांधकामं करण्यात येत आहेत. पहिला बोगदा (निलगार बोगदा-I) ४६८ मीटर लांबीचा आहे तर दुसरा बोगदा (निलगार बोगदा-II) १९७८ मीटर लांबीचा आहे. दोन्ही बोगदे ‘ट्विन ट्यूब टनेल’ आहेत. तिसरा बोगदा जो या प्रकल्पातील सर्वात मोठा आणि मुख्य भाग आहे तो झोजिला बोगदा आहे. या बोगद्याची लांबी १३ किमी आहे. हा बोगदा पश्चिमेकडील बालटालपासून सुरू होऊन पूर्वेकडील द्रासजवळ मीनामार्गाला जोडला जातोय. या प्रकल्पाचं काम २०२३ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.

काश्मीरच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाची वाट

झोजिला पास‘ नावानं ओळखल्या जाणाऱ्या हिमालयाच्या घाटातील या धोरणात्मक प्रकल्पामुळे जम्मू-काश्मीर आणि लडाख क्षेत्राच्या विकासाला मोठा हातभार लागणार आहे. त्यातून व्यापार, पर्यटनालाही वाव मिळेल.

Zojila Tunnel

काश्मीरमधल्या प्रचंड बर्फवृष्टीतही ‘झोजिला’ बोगद्याची पूर्णत्वाकडे वाटचाल

‘नॅशनल हायवेज अॅन्ड इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड’ (NHIDCL) कडून झोजिला बोगद्याच्या उभारणीची जबाबदारी ‘मेघा इंजिनिअरींग आणि इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड (MEIL) या अभियांत्रिकी कंपनीकडे सोपवण्यात आलीय. तर बोगद्याच्या कामांवर देखरेखीचं काम आयआयटी दिल्ली आणि आयआयटी श्रीनगर या प्रमुख तांत्रिक शिक्षण संस्थांकडे सोपवण्यात आलंय.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here