काय घडलं नेमकं?
विल स्मिथला किंग रिचर्डसाठी सर्वोत्कृष्ठ अभिनेत्याचं अवाॅर्ड मिळालं आहे. हा पुरस्कार मिळण्याआधीच क्रिस रॉकबरोबर त्याचं जोरात भांडण झालं. सूत्रसंचालक क्रिस स्टेजवर विल स्मिथच्या बायकोच्या केसावर कमेंट करत होता. ही गोष्ट स्मिथला आवडली नाही आणि तो भडकला.
या प्रकारानंतर अनेक सेलिब्रिटींनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेली कंगना रणौत हिनं देखील यावर सोशल मीडियावर द्वारे प्रतिक्रिया दिली आहे. तिनं विल स्मिथला पाठिंबा दर्शवलाय. ‘ माझ्या आई किंवा बहिणीच्या आजारपणाबद्दल कुणी अशी मस्करी केली असती तर मी देखील हेच केलं असतं, असं कंगनानं म्हटलं आहे.
तर अभिनेता वरुण धवन यानं देखील यावर प्रतिक्रिया देत क्रिस रॉकवर टीका केलीए. ‘वाटलं नव्हतं क्रिस रॉक कधीही असं करेल’, असं त्यानं म्हटलंय. तर ज्येष्ठ अभिनेत्री नितू कपूर यांनी देखील यावर भाष्य केलंय. , ‘.. आणि ते म्हणतात की महिलांना त्यांच्या भावनांना आवर घातला येत नाही.’ , असं नितू यांनी म्हटलंय.
