वृत्तसंस्था, एलव्हिव :

‘रशिया-युक्रेन संघर्षामध्ये युक्रेनला शांतता हवी आहे. दोन्ही देशांमधील शांततापूर्ण वाटाघाटी कोणताही विलंब न होता केल्या जाव्यात हीच आमची भूमिका आहे,’ असे युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी म्हटले आहे. रशियातील एका खासगी आणि सरकारी नियंत्रणात नसलेल्या माध्यम समूहाला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. ‘युक्रेनच्या सार्वभौमत्वाठी आम्ही लढत आहोत आणि यापुढेही त्यासाठी लढूच,’ असेही झेलेन्स्की म्हणाले.

युक्रेनचे अध्यक्ष म्हणाले, ‘नाटो देशांमध्ये सहभागी होण्याची आशा युक्रेनने सोडली पाहिजे अशी रशियाची भूमिका आहे. मात्र, तसे आम्हाला करता येणार नाही. रशियन महासंघासोबत करार करण्यास मी प्रयत्नशील आहे. मी स्वत: त्यासाठी वाटाघाटी करण्यास तयार आहे. वारंवार विविध ठिकाणी दिलेल्या मुलाखतींमध्येही मी हेच सांगितले आहे. राष्ट्राला संबोधून केलेल्या भाषणातही तेच बोललो आहे. युक्रेनला कोणताही विलंब न होता, उशीर न होता शांतता हवी आहे.’

किम जोंग उनने जगाची डोकेदुखी वाढवली; रशिया-युक्रेन युद्ध सुरू असतानाच केली मोठी घोषणा
Mexico Firing : गोळीबाराने मेक्सिको पुन्हा हादरले; १९ जणांचा मृत्यू; काही जण जखमी
रशिया – युक्रेन युद्धादरम्यान महत्त्वाच्या घडामोडी

– दरम्यान, या आठवड्यात तुर्कीमध्ये याबाबत बैठक होण्याची शक्यता आहे

– युरोपीय देशांची ‘युरोजस्ट‘ ही कायदाविषयक संघटना युक्रेनमधील युद्धासंबंधी गुन्ह्याची चौकशी करणार आहे. पोलंड, लिथुआनिया आणि युक्रेन येथे घडलेल्या विविध घटनांची सविस्तर नोंद घेतली जाईल

– पूर्वेकडे युक्रेनच्या सैन्याला चिरडण्याचा प्रयत्न रशियाकडून केला जात आहे

– रशिया-युक्रेन युद्धामुळे अरब राष्ट्रांना अन्नधान्याचा तुटवडा

China Lockdown : चीनमध्ये पुन्हा करोनाचं थैमान: कडक लॉकडाऊनची घोषणा
Imran Khan यांनी टाकला अखेरचा डाव; पंतप्रधानपद धोक्यात येताच म्हणाले…

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here