बुलढाणा : राज्यात आगामी निवडणुकांच्या तोंडावर राजकीय वातावरण तापलं असताना अशात सत्ताधारी आणि भाजप असा वाद वारंवार समोर येत आहे. या सगळ्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( nana patole ) यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर निशाणा साधला आहे. नाना पटोले यांच्या या वादग्रस्त विधानाचे काय राजकीय पडसाद उमटतात हे पाहणं महत्त्वाचं आहे.
खरंतर, नाना पटोले आणि मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी महाराष्ट्राच्या राज्यपालांवर तोंडसुख घेतलं. महाराष्ट्रातील बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव इथे काल ओबीसी समाज अधिकार संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल सहभागी झाले होते. अहमदनगरच्या वकिलाने खासदार विखेंना दिला कायदेशीर इशारा; म्हणाले… यावेळी नाना पटोले यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या लग्नावर भाष्य केलं होतं. त्यावर नाना पटोले म्हणाले की, “ते राज्यपाल पदावर आहे नाही तर….” असं म्हणत काही वेळ थांबत आपलं भाषण पुढे चालू ठेवलं. त्यांच्या या विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे.
दरम्यान, छत्तीसगडमध्ये मुख्यमंत्र्यांनीही नाना पटोले यांच्या मुद्याचे समर्थन करत राज्यपालपदाची प्रतिष्ठा राखली नाही तर तुम्हाला टीकेला सामोरे जावे लागेल, असेही ते म्हटले.