नवी दिल्ली : भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी टीना डाबी या लवकरच पुन्हा एकदा विवाहबंधनात (Ias Tina Dabi’s Wedding) अडकणार आहेत. टीना डाबी यांनी याबाबत इन्स्टाग्रामवर (Ias Tina Dabi On Social Media) आपल्या होणाऱ्या पतीसोबत फोटो शेअर करत माहिती दिली. या इन्स्टाग्राम पोस्टनंतर टीना डाबी या सोशल मीडियात चर्चेत असून टीना या त्यांच्याहून १३ वर्ष मोठ्या असलेल्या आयएएस अधिकारी प्रदीप गावंडे (IAS Pradeep Gawande) यांच्यासोबत २२ एप्रिल रोजी लग्न करणार आहेत.

टीना डाबी या यूपीएससी २०१६ च्या टॉपर असून सध्या राजस्थानमध्ये कार्यरत आहेत. मूळच्या दिल्ली येथील रहिवासी असणाऱ्या डाबी यांचा आयएएस अधिकारी अतहर खान यांच्यासोबत २०१८ साली पहिला विवाह झाला होता. या आंतरधर्मीय विवाहाची देशभरात मोठी चर्चा झाली, मात्र अवघ्या दोन वर्षांत दोघांमध्ये मतभेद झाले आणि त्यांनी सहमतीने वेगळं होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आता टीना डाबी यांनी प्रदीप गावंडे यांच्यासोबत लग्नगाठ बांधण्याचं ठरवलं आहे.

शरद पवारांचं आडनाव बदलून ‘आगलावे’ करा, सदाभाऊ खोत यांची खोचक टीका

कोण आहेत प्रदीप गावंडे?

मूळचे महाराष्ट्रातील असलेले ४१ वर्षीय प्रदीप गावंडे हे २०१३ च्या बॅचचे आएएस अधिकारी आहेत. गावंडे हे चुरू जिल्ह्याचे जिल्हाधिकारीही राहिले आहेत. यूपीएससी परीक्षेत उत्तीर्ण होण्याआधी त्यांनी वैद्यकीय शिक्षणही घेतलं होतं. MBBS ची पदवी घेतल्यानंतर त्यांनी यूपीएससी परीक्षेतही यश मिळवलं. प्रदीप गावंडे यांचाही हा दुसरा विवाह असणार आहे.

दरम्यान, जयपूर येथील एका भव्य हॉटेलमध्ये टीना दाबी आणि प्रदीप गावंडे यांचा विवाहसोहळा पार पडणार असून या सोहळ्याला देशभरातील विविध आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांना निमंत्रण करण्यात आलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here