दुबई :

राजकीय नेते मंचावरून मजा मस्ती करताना फारच कमी वेळा पाहायला मिळतात. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर नुकतेच एका जाहीर कार्यक्रमात अभिनेता रणवीर सिंह याच्यासोबत मंचावरच ठेका धरताना दिसले. दुबईमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

दुबईत भरलेल्या ‘इंडिया एक्सपो‘मध्ये ‘द ग्लोबल रीच ऑफ इंडियन मीडिया अॅन्ड एन्टरटेन्मेंट इंडस्ट्री’मध्ये उपस्थितांना हा प्रसंग पाहायला मिळाला. सोशल मीडियातून हा हलका-फुलका प्रसंग सर्वांच्याच समोर आला आणि काही वेळातच हा व्हिडिओ व्हायरलही झाला. खुद्द अनुराग ठाकूर यांनीही हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केलाय.

US Accident: अमेरिकेत बर्फवृष्टीमुळे भीषण अपघात, एकावर एक ६० गाड्या आदळल्या
India Sri Lanka: संकटात श्रीलंकेला भारताचं सहकार्य कायम राहणार, परराष्ट्रमंत्र्यांची ग्वाही
या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांना अभिनेता रणवीर सिंह याच्यासोबत संवाद साधायचा होता. रणवीर या कार्यक्रमासाठी लाल रंगाच्या पोशाखात दाखल झाला होता.

रणवीर आणि अनुराग ठाकूर दोघेही मंचावर उपस्थित असताना रणवीरचा सिनेमा ‘बाजीराव मस्तानी’ या सिनेमातील एक गाणं वाजू लागलं. साहजिकच लगेचच आपल्या गाण्यावर ठेका धरण्यासाठी रणवीर तयारच होता. त्यानं अनुराग ठाकूर यांनाही आपल्यासोबत नाचण्याचा आग्रह केला. यावर गर्दीनंही त्यांना प्रोत्साहन दिलं. त्यामुळे अनुराग ठाकूर यांनीही रणवीरसोबत ताल धरला.

‘दुबईच्या एक्सपोच्या इंडिया पॅव्हेलियनमध्ये मोठ्या संख्येत लोक सहभागी झाले होते. योग, आयुर्वेद, पर्यटन, टेक्सटाईल, कॉस्मिक वर्ल्ड आणि सिनेमा अशा अनेक भारतीय गोष्टींचं प्रदर्शन इथे पाहायला मिळालं आणि लोकांनाही ते खूप आवडलं. जवळपास १७ लाख लोकांनी इंडिया पॅव्हेलियनला भेट दिली’, असं अनुराग ठाकूर यांनी एएनआयशी बोलताना म्हटलं.

Imran Khan: पाकिस्तानात मोठी उलथापालथ; इम्रान खान यांच्यावर ओढवू शकते ही नामुष्की
Volodymyr Zelensky: शांतता हवी…चर्चा करा; वोलोदिमीर झेलेन्स्की यांची कळकळीची मागणी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here