मुंबई: दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचा ‘द काश्मीर फाइल्स‘ चित्रपट सध्या खूपच चर्चेत आहे. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर २०० कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आहे. असं असलं तरी या चित्रपटावरुन बॉलिवूडमध्ये दोन गट पडल्याचं दिसून आलंय. विवेक अग्निहोत्री यांनी अनेक सेलिब्रिटींवर निशाणा साधलाय. पण आता त्यांनी वरुण धवन याच्याबद्दल केलेलं वक्तव्य चर्चेत आलंय.
‘द काश्मीर फाइल्स’नंतर आता येणार ‘द दिल्ली फाइल्स’; दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींची घोषणा
बॉलिवूडमधील मोठ्या सेलिब्रिटींवर टीका करणारे विवेक अग्निहोत्री वरुणबद्दल बोलताना भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. वरुणबद्दल बोलताना अग्निहोत्रींच्या डोळ्यात पाणी आलं.

काय म्हणाले विवेक अग्निहोत्री?
‘मला हे कोणाला सांगायचं नव्हतं. पण आता हे सांगणं गरजेचं वाटतंय. मला जेव्हा खरी गरज होती तेव्हा वरुण धवन माझ्या पाठीशी उभा राहिला. तो एक चांगला अभिनेता आहेच, परंतु माणूस म्हणूनही तो खूप चांगलाय. त्यामुळं मला तो आयुष्यभर सुखी असावा, त्याच्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्या असं वाटतं. मला वरुणसोबत चित्रपट करायचाय. पण त्यानं मला मोठी आर्थिक मदक केलीए, हे मला सांगायचं नव्हतं. पण आता सांगतोय’, असं अग्निहोत्री म्हणालेत.
The Kashmir Files- राष्ट्रवादासाठी खलनायक लागतो, देशप्रेमासाठी नाही- कबीर खान
चित्रपटाला दिल्या शुभेच्छा
वरुणनं काही दिवसांपूर्वी चित्रपटाला पाठिंबा असल्याचं सांगितलं होतं. त्यानं सोशल मीडियावर पोस्ट करत चित्रपटाला शुभेच्छा देत कलाकारांचं कौतुक केलं होतं.

प्रेक्षकांचा प्रतिसाद
द काश्मीर फाइल्स‘ चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला जमवला असून अनेक मोठमोठे रेकॉर्ड मोडले आहेत. यात लोकप्रिय कलाकार नव्हते, कमी बजेट आणि कोणत्याही मोठ्या प्लॅटफॉर्मवर प्रमोशन झालं नसलं तरीही कथानक आणि अभिनयामुळे चित्रपटाच कौतुक होत आहे. सुरुवातीच्या काळात हा चित्रपट ७०० स्क्रीनवर रिलीज करण्यात आला. नंतर याची लोकप्रियता पाहता या चित्रपटाला २००० स्क्रीन्स वाढवून दिल्या. नंतर त्या ४००० करण्यात आल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here