नाशिक : सध्या कोणावर काय प्रसंग ओढावेल याचा काही नेम नाहीये. असाच एक भयंकर प्रकार नाशिकमध्ये समोर आला आहे. आजेसासुचा अंत्यविधी आटपून घरी कपडे वाळत घालत असतांना नातसुनेसोबत असं काही झालं की तिचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू असल्याची माहिती आहे.
अवघ्या दीड वर्षांपूर्वी आकांक्षाचा विवाह झाला होता. आकांक्षाच्या मृत्यूने अर्धावरच संसाराचा डाव मोडल्याने हळहळ व्यक्त होत आहे तर वीज कंपनीच्या गलथान कारभारामूळे निष्पाप नववाहितेचा मृत्यू झाल्याने संताप व्यक्त होत आहे.