पिंपरी चिंचवड : पुण्यात वारंवार अनेक धक्कादायक घटना समोर येत असतात. असाच एक भयंकर प्रकार पुन्हा समोर आला आहे. याचा एक व्हिडिओदेखील सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. शुल्लक कारणावरून पुण्यात गावगुंडांची टोळकी वाहनांची तोडफोड करतात. मात्र, पिंपरी-चिंचवड शहरातील बावधन बुद्रुक इथं एका पीएसआयच्या बायकोने हातात दगड घेऊन वाहनांची तोडफोड केली आहे.

सगळ्यात विशेष म्हणजे या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओदेखील समोर आला आहे. जमिनीच्या मुद्द्यावर झालेल्या वादातून पीएसआयच्या बायकोने आपल्याच जवळच्या नातलगांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करत कारची दगडाने तोडफोड केली आहे. पीएसआयची बायको कारची तोडफोड करतानाची दृश्य सीसीटीवी कॅमेऱ्यात कैद झाली आहेत.

शरद पवारांचं आडनाव बदलून ‘आगलावे’ करा, सदाभाऊ खोत यांची खोचक टीका
२३ मार्चला बावधन बुद्रुक या ठिकाणी दुपारी ३ वाजता दरम्यान ही घटना घडली आहे. या प्रकरणात हिंजवडी पोलिसात मायलेकींविरोधात सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर फिर्यादीच्या सासू या आरोपी महिलेला आमच्या जागेत बांधकाम करू नका असं समजवून सांगायला गेले असता आरोपी महिलेने आणि तिच्या आईने फिर्यादी महिलेला मारहाण केली.

आरोपी मारहाण करत असताना फिर्यादीचे सासरे आणि पती भांडण सोडविण्यासाठी गेले असता त्यांनादेखील आरोपी महिलेने मारहाण केली आहे. त्यानंतर फिर्यादी महिलेचे पती आणि सासू पोलीस चौकीत आरोपी महिलेविरोधात तक्रार देण्यासाठी गेले असता आरोपी महिलेने फिर्यादी महिलेवर दगड भिरकावून त्यांचा खून करण्याचा प्रयत्न केला. या सगळ्या प्रकाराची पोलिसांत नोंद झाली असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती आहे.

धक्कादायक! सासूच्या अंत्यविधीवरून घरी येताच सुनेचाही झाला मृत्यू, काळजाचा ठोका चुकावणारी घटना

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here