मुंबई : रणबीर कपूर आणि आलियाच्या ब्रह्मास्त्र सिनेमाची वाट फॅन्स आतुरतेनं पाहत आहेत. सिनेमा ९ सप्टेंबरला रिलीज होणार आहे. सिनेमाचं शूटिंग ५ वर्ष सुरू होतं. ते संपल्याचं दिग्दर्शक अयान मुखर्जीनं सांगितलं आहे. नुकतेच आयान, रणबीर आणि आलिया काशी विश्वनाथाच्या मंदिरात गेले होते. तिथले फोटो आता व्हायरल झाले आहेत.

अयाननं रणबीर आणि आलियासोबतचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोत मागे काशी विश्वनाथाचं मंदिरही दिसत आहे. हे मंदिर असंख्य घाट असलेल्या वाराणसीमध्ये आहे.

बोलायचं नव्हतं पण…वरुण धवनबद्दल विवेक अग्निहोत्रींचा मोठा खुलासा

रणबीर, आलिया आणि अयान तिघांच्या कपाळावर चंदनाचा टिळा आहे. गळ्यात फुलांच्या माळा आहेत. तिघंही शिवभक्तीत दंग झालेले दिसत आहेत. सिनेमाचं पोस्टर आणि टिझरमध्येही शंकराचा उल्लेख आहे.

याशिवाय अयान मुखर्जीनं आणखी एक फोटो शेअर केला आहे. त्यात गंगेमध्ये असंख्य साधूंच्या मधोमध रणबीर आणि आलिया दिसत आहेत. त्यांच्या अॅक्शनवरून ते हर हर महादेवचा जयजयकार करताना कळतंय. या पोस्टबरोबर अयाननं सिनेमा ५ वर्षांपूर्वी सुरू झाल्याचं लिहिलं आहे. वाराणसीत सिनेमाचं शेवटचं शूटिंग शेड्युल संपलं. या सिनेमात बिग बी, नागार्जुनही आहेत.

घोडचूक ! कतरिना कैफच्या बहिणीला ऑफर झालेला RRR

आलिया रणबीर वाराणसीत

लग्नाची सुरू आहे चर्चा
रणबीर-आलिया एकत्र सिनेमात दिसणार आहेतच. पण या दोघांच्या लग्नाचीही चर्चा जोरात सुरू आहे. लवकरच ही बातमी येणार आहे. कामाचं म्हणाल तर, आलियाचे ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’, ‘डार्लिंग्स’ आणि ‘जी ले जरा’ हे सिनेमे येणार आहेत. तर रणबीरचा शमशेराही आहेच. आलियाचा गंगुबाई काठियावाडी सिनेमा हिट झाला. त्यातल्या तिच्या अभिनयाचं खूप कौतुक सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here