बीड : लग्नाच्या मिरवणुकीत बेधुंद नाचणं एका २५ वर्षीय तरुणाच्या जीवावर बेतलं आहे. आपल्या मित्राच्या लग्नात निघालेल्या मिरवणुकीत बेधुंद होऊन नाचल्यानंतर तरुणाला थेट हृदयविकाराचा तीव्र धक्का बसला आणि यातच तरुणाचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू असल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना बीडच्या शिंदेवाडीमध्ये रात्री ८ च्या दरम्यान घडली आहे. वैभव रामभाऊ राऊत वय २५ रा. मनूर ता. माजलगाव असं मृत तरुणाचं नाव आहे. बीडच्या माजलगाव तालुक्यात असणाऱ्या शिंदेवाडीमध्ये माने-कोळसे यांचा शुभविवाहाचे आयोजन करण्यात आले होते. या लग्नातील नवरा-नवरी दोघेही शिंदेवाडी गावातील रहिवासी आहेत.

मातोश्रीवरून फोन येताच कोल्हापुरात राजकीय चक्रं फिरली, वंचितच्या उमेदवाराचा मोठा निर्णय
नवरदेव अक्षय माने याच्या विवाहाला वैभव रामभाऊ राऊत याच्यासह माजलगाव येथील मित्रही आले होते. यावेळी लग्नापूर्वी मारुतीला पाया पडण्यासाठी सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान नवरदेवाची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी सुरू असलेल्या ढोल ताशांच्या तालावर सर्व तरुण मंडळी बेधुंद नाचत होती.

यादरम्यान, मिरवणूक लग्नस्थळी मंडपात येताच, मयत वैभव राऊत मित्रांसह खुर्चीवर बसला व तेथे बसून त्याने तहान लागल्याने गटागट पाणी पिले. यावेळी त्याला लगेच हृदयविकाराचा तीव्र धक्का बसला. त्याला तात्काळ माजलगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. दरम्यान, दिवसभर उन्हाची कडक लहर होती आणि त्यात बेधुंद नाचल्याने तरुणाचा मृत्यू झाल्याने गावपरिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

शरद पवारांचं आडनाव बदलून ‘आगलावे’ करा, सदाभाऊ खोत यांची खोचक टीका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here