अहमदनगर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करणारे रयत क्रांती संघटनेचे नेते व माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्यावर राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून जोरदार प्रतिहल्ला केला जात आहे. खोत यांचा एक जुना व्हिडिओ शेअर करून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनीही खोत यांच्यावर टीका केली आहे. आंदोलन करताना दुधात पाणी घातलं जातं, अशी कबुली खोत व्हिडिओत देत आहेत. त्यावरून ‘ज्यांच्या दुधातच आहे पाणी, त्यांची कशी असेल शुद्ध वाणी?’ असा टोला रोहित पवार यांनी लगावला आहे.

पवार यांच्यावर टीका करताना खोत यांनी म्हटलं होतं, ‘शरद पवारांनी या राज्यात काड्या करण्यापलीकडं काहीही केलं नाही. जाईल तिथं आग लावायची आणि पुन्हा दुसऱ्या घरात आग लावण्यासाठी निघून जायचं. त्यांचं संपूर्ण आयुष्य हे आग लावण्यामध्येच गेलं आहे. त्यामुळे त्यांनी स्वत:चं पवार हे आडनाव बदलून ‘आगलावे’ करावं. या सगळ्यामध्ये हे राज्य होरपळून निघालं आहे, हे आता थांबलं पाहिजे,’ असं सदाभाऊ खोत म्हणाले होते.
मातोश्रीवरून फोन येताच कोल्हापुरात राजकीय चक्रं फिरली, वंचितच्या उमेदवाराचा मोठा निर्णय
यावरून राष्ट्रवादीनं त्यांना घेरलं आहे. आता आमदार रोहित पवार यांनी खोत यांचा जुना व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये खोत एका वृत्त वाहिनीला मुलाखत देत आहेत. तेव्हा सुरू असलेल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या आंदोलनासंबंधीची ही मुलाखत आहे. सध्या रस्त्यावर दूध ओतून आक्रमक आंदोलनं सुरू आहेत, आपण याकडं कसं पहाता, असा प्रश्न पत्रकार खोत यांना विचारत आहे.

शरद पवारांचं आडनाव बदलून ‘आगलावे’ करा, सदाभाऊ खोत यांची खोचक टीका
याला उत्तर देताना खोत म्हणत आहेत, ‘ज्या पद्धतीने मी गेली तीस वर्षे आंदोलनंच करीत आलोय. मला माहिती आहे दूध कसं ओतलं जातं. दूध किती असतं, त्यात पाणी किती असतं. ते कसं ओतलं जातं. याच्यातूनच मी पुढं आलेलो आहे.’या व्हिडिओवर रोहित पवार यांनी खोत यांच्यावर ही टीका केली आहे.

मित्राच्या लग्नात बेधुंद नाचताना झाली ‘मोठी’ चूक, तरुणाचा लग्न मंडपातचं मृत्यू

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here