मुंबई : आरआरआर सिनेमातील अभिनेता कोनिडेला राम चरण तेजा याला त्याचे चाहते प्रेमानं राम चरण या नावानं ओळखतात. आजमितीला राम चरण हा देशातील सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता म्हणून ओळखला जातो. राम चरण हा प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता चिरंजीवी यांचा मुलगा आहे. राम चरण हा हैदरबादमधील सर्वाधिक धनाढ्य कुटुंबातील आहे. त्याच्या एकट्याची एकूण संपत्ती सुमारे १ हजार ३०० कोटी रुपये इतकी आहे. राम चरणकडे आलिशान बंगले, गाड्या आहेत. जाणून घेऊ या राम चरणच्या संपत्तीबद्दल.

सर्वांसमोर संजना, अनिरुद्धनं केला अरुंधतीचा अपमान; मालिकेत ट्विस्ट

बंगल्याची किंमत ऐकून व्हाल चकित

राम चरण आणि त्याचे कुटुंबिय हैदराबादमधील सर्वात महागड्या घरात राहतात. प्रसिद्ध झालेल्या रिपोर्ट्सनुसार राम चरण सध्या रहात असलेल्या घराची किंमत ३० कोटींहून अधिक आहे.

राम चरणचा बंगला

आलिशान गाड्यांचा ताफा

राम चरणकडे Rolls Royce Phantom ही आलिशान गाडी आहे. ही ब्रिटिश लग्झरी गाडी असून याची किंमत ७ कोटी रुपये इतकी आहे. २००७ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘चिरुथा’ सिनेमातून राम चरण यानं अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण केलं. त्यानंतर त्यानं जी झेप घेतली ती कौतुकास्पद आहे. याशिवाय राम चरण याच्याकडे Aston Martin ही ब्रिटिश स्पोर्ट्स कार देखील आहे. भारतामधील एस्टन मार्टिन विंटेश गाडीची किंमत ३ कोटी रुपये इतकी आहे.

असं करायला नको होतं…राजामौलींवर आलिया भट्ट नाराज

आलिशान गाड्या

रिपोर्ट्सनुसार राम चरण याला ही गाडी काही वर्षांपूर्वी त्याच्या लग्नात सासरकडून मिळाली आहे. इतकेच नाही तर राम चरणकडे Range Rover Autobiography ही गाडी देखील आहे. राम चरणकडे असलेल्या महागड्या आणि आलिशान गाड्या पाहून त्याची आवड लक्षात येते.

महागड्या घड्याळांचाही शौक

राम चरण याला गाड्याशिवाय महागड्या घडाळ्यांचीही आवड आहे. त्याच्या कलेक्शनमध्ये ३० घड्याळं आहेत. राम चरणकडे Nautilus ब्रँडचं Patek Philippe हे घड्याळ आहे. याची किंमत ८० लाख रुपये इतकी आहे.

राम चरणला घडाळ्यांची आवड

पोलोची आवड

घड्याळ, गाड्या याशिवाय घोडेस्वारी करण्याची देखील राम चरणला आवड आहे. लहानपणीच त्यानं घोडेस्वारीचं प्रशिक्षण घेतलं आहे. त्याची स्वतःची हैदराबाद पोलो क्लब ही टीम आहे.

राम चरणला पोलोची आवड

विमान कंपनीचाही आहे मालक

राम चरणनं त्रुजेट एअरलाइन्समध्ये १२७ कोटी रुपये गुंतवले आहेत. या कंपनीचा तो चेअरमन आहे. या विमान कंपनीमधून रोज ५ ते ८ विमानांमधून वाहतूक केली जाते. राम चरण त्याच्या सिनेमाच्या प्रमोशनसाठी जेव्हा जेव्हा जातो तेव्हा तो त्याची बायको उपासनाबरोबर खासगी विमानानं जातो.

राम चरणची विमान कंपनी

अनेक रुग्णालयांत आहे भागीदारी

राम चरणनं उपासना कोनिडेला हिच्याबरोबर लग्न केलं आहे. उपासना अपोलो लाइफ कंपनीची चेअरमन आहे. ही कंपनी अपोलो रुग्णालयाशी संबंधित असून त्यातही रामचरणची गुंतवणूक आहे. याची स्थापना उपसनाचे आजोबा प्रताप चंद्र रेड्डी यांनी केली होती.

राम चरणचं हाॅस्पिटल

स्वतःची निर्मिती संस्था

राम चरण याची स्वतःची निर्मिती संस्था देखील आहे. त्याचं नाव कोनिडेला प्रॉडक्शन कंपनी असं आहे. या कंपनीचं मुख्यालय हैदराबाद इथंच आहे. या कंपनीतर्फे कैदी नंबर १५०, सई रा नरसिम्हा रेड्डी, आचार्य या सिनेमांची निर्मिती झाली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here