Yogesh Kadam | दापोली नगरपंचायत निवडणुकीपासून अनिल परब आणि रामदास कदम यांच्यामधून विस्तवही जात नाही. याचेच पडसाद आता आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यावेळी उमटण्याची शक्यता आहे.

 

Yogesh Kadam Aaditya Thackeray
Yogesh Kadam : शिवसेना नेते आदित्य ठाकरे आपले मार्गदर्शक नेते आहेत त्यांची राजकारण करण्याची विकसात्मक स्वरूप पाहूनच आपण राजकारणात आलो.

हायलाइट्स:

  • दापोली नगरपंचायतकडून आपला जेवढा अवमान करता येईल तितका ते करत आहेत
  • निमंत्रण पत्रिकेवरही स्थानिक आमदार म्हणून आमदार योगेश कदम यांचे नाव खाली छापण्यात आले आहे
प्रसाद रानडे, रत्नागिरी: शिवसेना नेते अनिल परब आणि रामदास कदम यांच्यातील वादामुळे काही दिवसांपूर्वी राजकारणाच्या केंद्रस्थानी आलेल्या दापोलीत नाराजीनाट्याचा नवा अंक रंगण्याचे संकेत मिळत आहेत. कोकण दौऱ्यावर असलेले पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) बुधवारी दापोलीत येणार आहेत. या पार्श्वभूमीवर रामदास कदम यांचे पूत्र आणि स्थानिक आमदार योगेश कदम (Yogesh Kadam) यांनी आपल्या नाराजीचे उघडउघड प्रदर्शन करण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी मंगळवारी दापोलीत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी आपण आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या केवळ एकाच कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याचे स्पष्ट केले. दापोली नगरपंचायीतच्या उर्वरित कार्यक्रमांना आपण हजर राहणार नाही, असे त्यांनी म्हटले.
Aditya Thackeray: भाजपशी पुन्हा मैत्री कराल का? आदित्य ठाकरेंनी मुद्दाच निकाली काढला
शिवसेना नेते आदित्य ठाकरे आपले मार्गदर्शक नेते आहेत त्यांची राजकारण करण्याची विकसात्मक स्वरूप पाहूनच आपण राजकारणात आलो. त्यामुळे त्यांच्या उपस्थितीत होत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्याला आपण उपस्थित राहणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराज सगळ्यांचे आहेत. यामध्ये आपण राजकरण करणार नाही. ज्यांना यातही राजकारण करायचे त्यांना करू दया. गेल्या २५ वर्षात हा अश्वारूढ पुतळा उभा करणे जमले नाही. वाढदिवसाच्या नावाखाली पुतळा उभारण्यात येईल, असे सांगत ११ लाख रुपये कोणी जमा केले? कोणी अकरा लाख रुपये खाल्ले? या सगळ्या गोष्टींची माहिती येथील जनतेला आहे, असा टोलाही आमदार योगेश कदम यांनी माजी आमदार सूर्यकांत दळवी यांचे नाव न घेता लगावला.
Aditya Thackeray: एकमेकांविरुद्ध लढल्यामुळे महाविकास आघाडीत थोडीफार खदखद:आदित्य ठाकरे
दापोली नगरपंचायतीकडून आपला जेवढा अवमान करता येईल तितका ते करत आहेत. निमंत्रण पत्रिकेवरही स्थानिक आमदार म्हणून आमदार योगेश कदम यांचे नाव खाली छापण्यात आले आहे. काही ठिकाणी बॅनरवरही आपला अपमानच करण्यात आला आहे, असे योगेश कदम यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे निमंत्रण आमदार योगेश कदम यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना दिले होते त्यावेळी २९ मार्च ही तरीख निश्चित झाली होती. पण २६ मार्च रोजी नगरपंचायत वर्धापनदिन आहे त्यामुळे त्याच दिवशी हे अनावरण होईल अशी भूमिका शिवसेना-राष्ट्रवादी आघाडीकडून घेण्यात आली. नंतर पालकमंत्री अनिल परब यांच्या माध्यमातून आदित्य ठाकरे यांची भेट घेऊन ३० मार्च ही तारीख निश्चित करण्यात आली. हा कार्यक्रम नगरपंचायत नियोजन करेल व त्या माध्यमातूनच होईल अशी भूमिका माजी आमदार सूर्यकांत दळवी यांनी घेतली.

दापोली नगरपंचायत निवडणुकीपासून आमदार योगेश कदम नाराज आहेत. निवडणूक प्रक्रियेत पालकमंत्री अनिल परब यांनी राष्ट्रवादीशी आघाडी करत आमदार योगेश कदम यांना दूर ठेवले. पण या आघाडीचा फायदा शिवसेनेपेक्षा राष्ट्रवादीलाच जास्त झाला हे निवडणूक निकालावरून स्पष्ट झाले. तेव्हापासूनच येथील शिवसेनेत मोठी खदखद निर्माण झाली आहे. त्यामुळे आता या सगळ्या विषयावर आदित्य ठाकरे कोणती भूमिका मांडतात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : shiv sena minister aaditya thackeray in dapoli yogesh kadam express displeasure before event
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here