पुणे : पुणे महापालिकेतील वाढत्या रिक्त पदांमुळे दैनंदिन कामकाजावर परिणाम होत असल्याने पुढील दोन महिन्यांमध्ये इंजिनीअरिंग, आरोग्य आणि प्रशासकीय विभागातील पदे भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या पदांसह अग्निशामक दलातील मनुष्यबळाची कमतरता दूर करण्यासाठी दोनशे जवानांची तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी पद्धतीने भरती केली जाणार आहे.

महापालिकेतील भरतीसाठीची शैक्षणिक पात्रता व इतर अटी-शर्ती, त्याची प्रक्रिया याची सविस्तर माहिती येत्या महिन्याभरात जाहीर करण्यात येईल आणि मे महिन्यात परीक्षा घेण्यात येतील, अशी माहिती महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांनी मंगळवारी दिली.

प्राप्तिकर विभागाला धक्का; त्या नोटिसा उच्च न्यायालयाकडून रद्द
महापालिकेचा आकृतिबंध यापूर्वीच मंजूर झाला असला, तरी अद्याप विविध विभागांतील अनेक पदे रिक्त आहेत. सध्या पालिकेत रस्ते, पाणी, मलनिस्सारण अशा महत्त्वाच्या खात्यांमध्ये शाखा अभियंत्यांची (ज्युनिअर इंजिनीअर) कमतरता आहे. आजमितीस साडेतीनशे पदे रिक्त असून, पहिल्या टप्प्यात त्यापैकी दोनशे पदे भरण्यात येणार आहेत. इंजिनीअरसह आरोग्य खात्यात आणि प्रशासकीय खात्यातही आवश्यक कर्मचाऱ्यांची भरती करणे आवश्यक आहे. त्यामुळे येत्या महिन्याभरात या सर्वच पदांची नेमकी संख्या, त्यासाठी पात्रता व इतर निकष निश्चित केले जातील आणि त्यानंतर पुढील प्रक्रिया केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

शहराचा वाढता विस्तार आणि नव्याने समाविष्ट झालेल्या २३ गावांचा विचार करता महापालिकेच्या अग्निशामक दलात सध्या जवानांची संख्या कमी आहे. महापालिकेने विस्तारणाऱ्या परिसरात अग्निशामक केंद्रे सुरू केली असली, तरी तेथे मनुष्यबळाअभावी ती सध्या बंदच ठेवण्यात आली आहेत. ही कमतरता दूर करण्यासाठी दोनशे जवान कंत्राटी पद्धतीने तातडीने भरण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

राज्यातील MBBS प्रवेशांसाठी मुदत निश्चित

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here