इस्लामाबाद, पाकिस्तान :

खुर्ची वाचवण्यासाठी जीव तोडून प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तान पंतप्रधान इम्रान खान यांना सहकारी पक्ष मुत्ताहिदा कौमी मूव्हमेंट पाकिस्तान (MQM-P) नं जोरदार झटका दिलाय. त्यामुळे इम्रान खान सरकार कोसळणार हे जवळपास निश्चित समजलं जातंय.

बहुमत विरोधकांच्या पारड्यात

संयुक्त विरोधी पक्षांकडून मांडण्यात आलेल्या अविश्वास ठरावावर मतदानापूर्वीच ‘एमक्यूएम पी’नं इम्रान खान यांच्याविरुद्ध मतदान करण्याचा निर्णय घेतलाय. एमक्यूएम-पी कडे एकून सात खासदार आहेत. यामुळे इम्रान खान यांच्या समर्थक खासदारांची संख्या १६४ वर पोहचलीय. तर विरोधकांकडे १७७ खासदार आहेत. पाकिस्तान नॅशनल असेम्ब्लीमध्ये एकूण ३४२ सदस्य आहेत. त्यामुळे बहुमतासाठी १७२ सदस्यांची आवश्यकता आहे. अर्थात विरोधकांना आता इम्रान खान यांच्या बंडखोरांचीही गरज उरलेली नाही.

Imran Khan यांनी टाकला अखेरचा डाव; पंतप्रधानपद धोक्यात येताच म्हणाले…
India Sri Lanka: संकटात श्रीलंकेला भारताचं सहकार्य कायम राहणार, परराष्ट्रमंत्र्यांची ग्वाही
अविश्वास ठरावावर ३ एप्रिल रोजी मतदान?

पाकिस्तानच्या जिओ न्यूजनुसार, या ताज्या घडामोडीनंतर इम्रान खान सरकारनं संसदेच्या कनिष्ठ सभागृहात आपलं बहुमत गमावलंय, हे निश्चित. अविश्वास ठरावावर ३ एप्रिल रोजी मतदान होऊ शकतं, यात इम्रान खान यांची गच्छंती निश्चित असल्याचं मानलं जातंय.

विरोधी पक्षांसोबत एका मसुद्यावर स्वाक्षरी केल्यानंतर एमक्यूएम-पीनं हा निर्णय जाहीर केला. तसंच पाकिस्तान पिपल्स पार्टी (PPP)चे अध्यक्ष बिलावल भुट्टो झरदारी यांनी ट्विट करून याबद्दल माहिती दिलीय.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तान संसदेतील विरोधी पक्षनेते शाहबाज शरीफ, पीडीएमचे प्रमुख मौलाना फजलुर रहमान आणि आसिफ अली झरदारी यांनी या करारावर स्वाक्षरी केली आहे.

Taliban: दाढीला केस नाही तर काम नाही, आता तालिबानचा पुरुषांसाठी नवा फर्मान
VIDEO: दुबईत रणवीर सिंहसोबत केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनीही धरला ठेका

इमरान सरकारकडे सद्य खासदार
पीटीआई – १५५
पीएमएल क्‍यू – ४
जीडीए – ३
एएमएल – १
बीएपी – १
एकूण – १६४ खासदार

विरोधी खासदार
पीएमएल-एन – ८४
पीपीपी – ५६
एमएमए – १४
बीएपी – ४
बीएनपी एम – ४
निर्दलीय – ४
एएनपी – १
जेडब्‍ल्‍यूपी – १
जेआई – १
एमक्‍यूएम पी – ७
पीएमएल क्‍यू – १
एकूण – १७७

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here