युक्रेनची नागरिक असलेल्या एका महिलेवर तिच्या लहानग्यांसमोरच तीन वेळा बलात्कार करण्यात आला. तसंच तिच्या पतीची गोळ्या घालून हत्या करण्यात आली, असा आरोप युक्रेनकडून करण्यात आलाय.
रशियानं युक्रेनवर चढवलेल्या हल्ल्याला आता महिना उलटून गेलाय. याच दरम्यान रशियन सैनिकांनी अत्यंत घृणास्पद वर्तन केल्याचा आरोप युक्रेनच्या महिला खासदार मारिया मेन्जेटसेवा यांनी ‘स्काय न्यूज’ला दिलेल्या मुलाखतीदरम्यान केलायय.
कीव्हची रहिवासी असलेल्या या महिलेवर तिच्या मुलांसमोर बलात्कार करण्यात आल्याचं सांगत मारिया यांनी चीड व्यक्त केलीय.
डेली मेलच्या रिपोर्टनुसार, युक्रेनमध्ये रशियन सैनिकांकडून महिलांसोबत बलात्काराच्या घटना समोर येण्याची ही काही पहिली वेळ नाही.
त्या मुलांच्या मनावर काय परिणाम झाला असेल ज्यांनी आपल्या आईसोबत हे सर्व घडताना पाहिलं असेल. आम्ही शांत राहणार नाही, असंही मारिया यांनी म्हटलंय. युक्रेनच्या प्रोसिक्युटर जनरल इरिना वेनेदिक्तोवा यांनीही या घटनेची चौकशी केली जाईल, असं म्हटलंय.
कीव्हस्थित एका घरात रशियन सैनिक घुसले तेव्हा ते नशेत झाले होते. त्यांनी महिलेसमोरच तिच्या पतीची हत्या केली. त्यानंतर त्यांनी वारंवार महिलेवर बलात्कार केला. मुलांनाही त्यांनी धमकी दिली, असा दावा वेनेदिक्तोवा यांनी केलाय. त्यांच्या म्हणण्यानुसार, यापूर्वी रशियाच्या दोन सैनिकांनी पूर्व कीव्हच्या ब्रोवरी भागात महिलांवर हल्ला केला होता. यातील एका सैनिकाची ओळख पटवण्यात आली तसंच त्याच्यावर आरोपही निश्चित करण्यात आलेत.