Health Minister Informed That There Is No Restriction Of Corona In The State From 1 April | मोठी बातमी! १ एप्रिलपासून राज्यात करोनाचे निर्बंध हटणार पण…, आरोग्यमंत्र्यांची माहिती
जालना : राज्यात करोनाच्या रुग्णांची संख्या कमी होत असताना आता नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण, १ एप्रिलपासून करोनासंबंधीचे सर्व निर्बंध मागे घेण्यात येणार आहे. यासंबंधी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माहिती दिली आहे.
गुढीपाडव्याआधीच नागरिकांसाठी ही आनंदाची बातमी म्हणावी लागेल. १ एप्रिलपासून आपत्कालीन कायदा मागे घेण्यासाठी प्रक्रिया सुरू होईल. पण असं असलं तरीही मास्क वापरणं हे अनिवार्य आहे. मास्कशिवाय कोणीही बाहेर फिरताना दिसेल तर त्यांच्यावर कारवाई होईल अशीही माहिती राजेश टोपेंकडून देण्यात आली आहे. दरम्यान, यावेळी लसीकरणाच्या बाबतीत चलढकल नको, अशा सूचना राजेश टोपे यांनी दिल्या आहे. लोकांकडून वारंवार रेल्वे, बस, मॉल्स यासंबंधी निर्बंध शिथील करण्याच्या मागण्या आल्या. त्यावर आता सकारात्मक विचार करण्यात आला असून १ एप्रिलपासून करोनाचे सर्व निर्बंध काढण्यात आले आहेत. पण मास्कसक्ती मात्र कायम आहे.