देशातील लॉकडाऊनला १४ दिवस पूर्ण होत असताना आज राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. त्यात त्यांनी काही गोष्टी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणल्या आहेत. ‘केंद्र सरकारनं तीन महिन्याचं धान्य रेशन दुकानांतून मोफत देण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. त्यातील ९० टक्के कोटा राज्याला मिळाला देखील आहे. मात्र, त्याचं अद्याप वितरण झालेलं नाही. देशातील १६ राज्यांनी रेशनकार्ड नसलेल्या नागरिकांनाही धान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातही असा निर्णय घेणं शक्य आहे, असं फडणवीस यांनी पत्रात म्हटलं आहे.
करोनाग्रस्तांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी आवश्यक असलेल्या उपययोजनांमध्ये अनेक त्रुटी आहेत. त्यामुळं मोठ्या संख्येनं डॉक्टर व आरोग्य सेवक बाधित होताना दिसत आहेत. याकडं त्वरीत लक्ष देण्याची विनंती फडणवीस यांनी केली आहे. सरकारच्या सर्व निर्णयांना भाजपचा पाठिंबा आहे,’ असंही फडणवीस यांनी नमूद केलं आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times