पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतातील टांक जिल्ह्यात संरक्षण दलावर दहशतवादी हल्ला करण्यात आलाय. अर्धसैनिक दलावर करण्यात आलेल्या या हल्ल्यानंतर तीन दहशतवाद्यांना ठार करण्यात आल्याची माहिती मिळतेय. तर या हल्ल्यात तब्बल २२ जण जखमी झालेत. या हल्ल्यात सेनेला किती नुकसान सहन करावं लागलंय, याची माहिती अद्याप मिळालेली नाही.
सैन्य शिबिरात आत्मघातकी हल्लेखोरांनी काही दिवसांपासून एन्ट्री मिळवली होती, असं म्हटलं जातंय. या हल्ल्यामागे तहरिक ए तालिबान पाकिस्तान (TTP) या दहशतवादी संघटनेचा हात असल्याचं म्हटलं जातंय.
पाकिस्तानी मीडियानं दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोर गेल्या दिवसांपासून शिबिरानजिक लपून बसले होते. या हल्लेखोरांकडून अमेरिकन बनवावटीची हत्यारं जप्त करण्यात आली आहेत. घटनास्थळावरून तीन दहशतवाद्यांचे मृतदेह हाती घेण्यात आलेत. प्रशासनाकडून या भागात जाणारे सगळे रस्ते रोखण्यात आले.
या हल्ल्यानंतर ‘तहरिक ए तालिबान पाकिस्तान’ विरुद्ध अद्याप कोणतेही पुरावे मिळालेले नाहीत. परंतु, टीटीपीच्या अनेक दहशतवाद्यांना अफगाणिस्तानात आसरा मिळतो. तिथूनच ते पाकिस्तानी सेनेवर हल्ला करण्याचे कट रचत असल्याचं अनेकदा समोर आलंय. या हल्ल्यांमुळे तालिबान आणि पाकिस्तान दरम्यान तणाव वाढत चालल्याचं समोर येतंय.