nanar refinery project: rajapur : ठाकरे सरकार हाय हाय… राजापूरमध्ये रिफायनरीविरोधात स्थानिकांचा प्रचंड मोर्चा – protest against oil refinery project in rajapur
राजापूर, रत्नागिरी: नाणारमध्ये प्रस्तावित तेलशुद्धीकरण प्रकल्पाला (रिफायनरी) विरोध झाला. यामुळे आता हा प्रकल्प रत्नागिरीत जिल्ह्यातील राजापूरच्या बारसू सोलगाव परिसरात आणता येईल, असा प्रस्ताव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( protest against oil refinery project in rajapur ) यांनी पंतप्रधान मोदींना लिहिलेल्या पत्रात दिला आहे. यासाठी जवळपास १४ हजार एकर जमीन आणि बंदरासाठी आवश्यक असलेली जमीनही उपलब्ध करून दिली जाईल, असे उद्धव ठाकरे यांनी पत्रात म्हटले आहे. आता महाराष्ट्र सरकारच्या या भूमिकेविरोधात राजापूरच्या बारसू सोलगावमधील ग्रामस्थांनी विरोध केला आहे.
प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाविरोधात बारसू सोलगाव परिसरातील जनता रस्त्यावर उतरली आहे. नागरिकांनी राजापूरमध्ये भव्य मोर्चा काढत प्रकल्पाला विरोध केला आहे. जमीन विकणाऱ्या दलालांचं वाटोळं होऊ दे… जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची … एकच जिद्द रिफायनरी रद्द … रिफायनरी हटवा … कोकण वाचवा …. ठाकरे सरकार हाय हाय… अशा जोरदार घोषणांनी राजापूर दणादणले.
रिफायनरीविरोधातील मोर्चात प्रचंड संख्येने नागरिक सहभागी झाले. महिलांचाही यात मोठा सहभाग आहे. सर्वांनी प्रकल्प रद्द करण्याची मागणी केली. राजापूरच्या जवाहर चौकातील खर्ली नदीपात्रातून मोर्चाला सुरवात झाली. राजापूर तहसील कार्यालयावर मोर्चा नेऊन प्रशासनाचे लक्ष वेधण्यात येणार आहे. निवेदन दिले जाणार आहे. रिफायनरी विरोधी समितीचे अशोक वालम, अमोल बोळे प्रकल्प विरोधी समितीचे नेते सत्यजीत चव्हाण यांच्यासह इतर अनेक जण मोर्च्यात सहभागी झाले.
राजापूरमध्ये रिफायनरीविरोधात स्थानिकांचा प्रचंड मोर्चा