औरंगाबाद पाठोपाठ लातुरात आठ, उस्मानाबादेत तीन आणि जालना, हिंगोली जिल्ह्यात प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे. विभागातील २७ रुग्णांपैकी औरंगाबादच्या एका रुग्णास तपासणीअंती डिस्चार्ज देण्यात आलेला आहे तर एक रुग्ण हा खासगी रुग्णालयात दाखल आहे. एका ५२ वर्षीय करोनाबाधिताचा मृत्यू झालेला आहे.
२२ हजार नागरिकांची तपासणी
करोनाच्या पार्श्वभमीवर औरंगाबाद महापालिकेच्या पथकांनी आतापर्यंत २२ हजार ४७२ नागरिकांची आरोग्य तपासणी केली आहे. तपासणीचे हे काम सुरूच राहणार आहे, अशी माहिती आज महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी पत्रकारांना दिली.
‘करोना प्रयोगशाळा’ तयार
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील इन्क्युबेशन केंद्रामध्ये ‘ तपासणी प्रयोगशाळा’ तयार झाली आहे. येत्या दोन दिवसांमध्ये या प्रयोगशाळेसाठी आवश्यक त्या मान्यता केंद्र सरकारच्या राष्ट्रीय वैद्यकीय संशोधन परिषदेकडून (आयसीएमआर) प्राप्त होणार आहेत. त्यानंतर करोना संसर्गजन्य द्रवाचे नमुने तपासणी सुरू करण्यात येणार आहे. प्रयोगशाळेसाठी लागणारे अत्याधुनिक उपकरण रियल टाइम पीसीआर उपलब्ध आहे. त्याद्वारे एकाचवेळी दोन तासात ३८४ करोना संसर्गाचे स्वॅबचे नमुने तपासता येतात.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times