Kalyan Crime News: चाकूचा धाक दाखवून प्रवाशाचा मोबाइल लुबाडणाऱ्या चोरट्याला कल्याण रेल्वे पोलिसांनी अवघ्या दोन तासांत अटक केली आहे.

 

Kalyan Crime News
कल्याणमध्ये मोबाइल चोरास अटक
कल्याण: पहाटेच्या सुमारास चाकूचा धाक दाखवून एका प्रवाशाचा मोबाइल लुबाडल्याची घटना कल्याण रेल्वे स्थानक परिसरात घडली होती. या प्रकरणी प्रवाशाने कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. कल्याण रेल्वे पोलिसांनी केवळ वर्णनावरून शोध घेत या चोरट्याला अवघ्या दोन तासांत कल्याण बैलबाजार परिसरातून अटक केली आहे. मोनू चाळके अस या आरोपीचे नाव असून तो रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे पोलिसांनी सांगितले .

वाचा: काँग्रेस, राष्ट्रवादीनंतर शिवसेनेचा विखे पाटलांवर निशाणा; केले गंभीर आरोप

कल्याण रेल्वे स्थानक परिसरात क्रमांक एकच्या फलाटापासून काही अंतरावर रुळावरून एक प्रवाशी काल पहाटे च्या सुमारास घरी परतत होता. अंधाराचा फायदा घेत अज्ञात चोरटा या ठिकाणी दबा धरून बसला होता. अचानक या चोरट्याने प्रवाशाला पकडलं. त्याला चाकूचा धाक दाखवत त्याच्याकडील महागडा मोबाईल हिसकावून चोरट्याने तिथून पळ काढला. या प्रकरणी प्रवाशाने कल्याण रेल्वे पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. प्रवाशाने या चोरट्याचं वर्णन पोलिसांना सांगितलं. या वर्णनाच्या आधारे रेल्वे पोलिसांच्या पथकाने या चोरट्याचा शोध सुरू केला. पोलिसांनी अवघ्या दोन तासांत या चोरट्याला कल्याणमधील बैलबाजार परिसरातून अटक केली. या चोरट्यांकडून पोलिसांनी चाकू व चोरीला गेलेला मोबाइल हस्तगत केला आहे. अटक केलेला मोनू चाळके हा अंबरनाथ येथील रहिवासी असून त्याच्या विरोधात आधी देखील गुन्हे दाखल असल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली आहे.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : kalyan railway police arrested a man within two hours of theft
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here