इस्लामाबाद, पाकिस्तान :

पाकिस्तानच्या राजकारणात गेल्या दोन दिवसांत घडामोडींनी प्रचंड वेग घेतलाय. पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरुद्ध विरोधकांनी मांडलेल्या अविश्वास ठरावावर मतदानापूर्वी अनेक सहकारी पक्षांनी सत्ताधारी युतीतून काढता पाय घेतलाय. याच दरम्यान, बुधवारी पाकिस्तानच्या सूचना मंत्र्यांनी मात्र पंतप्रधान इम्रान खान यांना पाठिंबा दर्शवलाय.

‘पंतप्रधान इम्रान खान शेवटच्या चेंडूपर्यंत खेळत राहणार. ते राजीनामा देणार नाहीत’ असं उर्दूत ट्विट पाकिस्तानचे सूचना मंत्री फवाद खान यांनी केलंय.

पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरुद्ध मांडण्यात आलेल्या अविश्वास ठरावावर येत्या ३ एप्रिल रोजी मतदान होणार आहे.

Imran Khan Resignation Live: पाकिस्तानात सत्तांतराच्या घडामोडींना वेग, इम्रान खान यांची ‘मन की बात’ रद्द
PM Imran Khan: पाक पंतप्रधान इम्रान खान यांनी बहुमत गमावलं; गच्छंती निश्चित

दरम्यान, पंतप्रधान इम्रान खान यांनी काहीवेळापूर्वीच पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल बाजवा आणि आयएसआय या गुप्तहेर संस्थेच्या महासंचालकांची भेट घेतली. यानंतर इम्रान खान यांचा जनतेशी संवाद रद्द करण्यात आल्याची माहिती पाकिस्तानी खासदार फैसल जावेद खान यांनी दिलीय.

एमक्यूएम पी पक्षानं विरोधकांशी हातमिळवणी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर सध्या पंतप्रधान इम्रान खान यांच्याकडे १६४ समर्थक खासदार आहेत तर विरोधकांकडे १७७ खासदार आहेत. पाकिस्तान संसदेत एकूण ३४२ सदस्य आहेत. बहुमतासाठी १७२ सदस्यांची आवश्यकता आहे.

इम्रान खान सरकारला पाठिंबा देणाऱ्या खासदारांची संख्या

पीटीआई – १५५
पीएमएल क्‍यू – ४
जीडीए – ३
एएमएल – १
बीएपी – १
एकूण – १६४ खासदार

विरोधी खासदारांची संख्या
पीएमएल-एन – ८४
पीपीपी – ५६
एमएमए – १४
बीएपी – ४
बीएनपी एम – ४
निर्दलीय – ४
एएनपी – १
जेडब्‍ल्‍यूपी – १
जेआई – १
एमक्‍यूएम पी – ७
पीएमएल क्‍यू – १
एकूण – १७७

Terror Attack in Pakistan: पाकिस्तान संरक्षण दलावर दहशतवादी हल्ला, तीन हल्लेखोरांना कंठस्नान
Terror Attack in Israel: इस्राईलमध्ये सात दिवसांत तिसरा दहशतवादी हल्ला, पाच जणांचा मृत्यू

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here