Local Train | शिवीगाळ करणाऱ्या या फेरीवाल्याला एका पोलीस कर्मचाऱ्याने हटकले. तेव्हा फेरीवाल्याने पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण करण्याचा प्रयत्न केला. कांबळे विरोधात गुन्हा दाखल करीत त्याला अटक केली आहे.

हायलाइट्स:
- आंबिवली रेल्वे स्थानकात पोलिस कर्मचारी रोहित जाधव हे कर्तव्य बजावत होते
- महिलांच्या डब्यासमोर उभे राहून शिवीगाळ रणारा हा फेरीवाला मद्यधुंद अवस्थेत होता
आंबिवली रेल्वे स्थानकात पोलिस कर्मचारी रोहित जाधव हे कर्तव्य बजावत होते. याचवेळी मद्यधुंद अवस्थेत असलेला गौतम कांबळे हा फेरीवाला स्टेशनवर आलेल्या लोकल मधील महिला डब्याच्या बाहेर उभा राहून शिवीगाळ करत होता. प्लॅटफॉर्मवर गस्त घालत असताना जाधव यांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी गौतमला हटकले व तेथून निघून जाण्यास सांगितले. मात्र, तो काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता.त्याने आणखी जोराने शिवीगाळ सुरु केली. गौतम याने रोहित जाधव याला धक्काबुक्की करत मारहाण करण्यास सुरुवात केली. नागरिकांच्या मदतीने रोहित यांनी गौतमला ताब्यात घेतले. कल्याण जीआरपी पोलिसांनी गौतम कांबळे विरोधात गुन्हा दाखल करीत त्याला अटक केली आहे. गौतम कांबळे हा फेरीवाला आहे. तो ठाणे स्थानकासह अन्य स्थानकात व्यवसाय करतो.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
या बातम्यांबद्दल अधिक वाचा
Web Title : feriwala beatn police abusing near ladies compartment of local train on ambivli railway station maharashtra
Marathi News from Maharashtra Times, TIL Network
Marathi News from Maharashtra Times, TIL Network