अभिजीत शशिकांत शिंदे वय ३८ असं या तरुणाचं नाव आहे. तो पिंपरीतील लिंक रोड येथील रहिवासी होता. द कश्मीर फाईल्स चित्रपट बघून त्याला ब्रेन स्ट्रोक होऊन त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. खरंतर, अभिजीतवर हिंदुत्ववादी संघटनेचा प्रभाव आहे. त्यामुळे अतिविचाराने हे झालं असावं असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. अभिजित आणि त्याचे काही मित्र २१ मार्च रोजी रात्री द कश्मीर फाइल्स हा चित्रपट बघितला होता. चित्रपट बघून झाल्यावर घरी आल्यानंतर अभिजित आणि त्याच्या मित्रांनी जवळपास तासभर चित्रपटावर चर्चा केली.
मित्रांसोबत चर्चा उरकून अभिजीत नेहमीप्रमाणे झोपण्यासाठी घरी गेला. मात्र, दुसऱ्या दिवशी पहाटे सकाळी अभिजीतच्या मेंदूची रक्तवाहिनी फुटली आणि मेंदूला रक्त पुरवठा बंद झाल्यामुळे त्याला ब्रेन स्ट्रोक झाला. मेंदूला रक्तपुरवठा करणारी रक्तवाहिनी फुटल्याने तो बेशुद्ध झाला. अभिजीत जेव्हा सकाळी लवकर उठला नाही तेव्हा त्याच्या वडिल त्याच्या रूममध्ये गेले असता अभिजीत बेशुद्ध अवस्थेत आढळला. त्यानंतर त्याला हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले परंतु त्याला मृत घोषित करण्यात आलं होतं.
अभिजीतचा ब्रेन स्ट्रोकने मृत्यू झाला आहे. मात्र, त्याच्या ब्रेन स्ट्रोकच कारण काय आहे ? हे स्पष्ट होऊ शकले नाहीये. परंतु रात्री द कश्मीर फाईल्स चित्रपट बघितला आणि त्यामुळे त्याला ब्रेन स्ट्रोक झाला असल्याचा त्याच्या मित्रांचा आणि कुटुंबीयांचा दावा आहे.