महाराष्ट्रात करोनाच्या रुग्णांची संख्या ही १ हजारांवर गेली आहे. यापैकी ६४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ८६८ जणांवर उपचार सुरू आहेत. दुसरीकडे तामिळनाडूतही ६२१ करोना जण करोना पॉझिडिव्ह आढळून आले आहेत. मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये प्रत्येकी १३ जणांचा करोनाने मृत्यू झाला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २४ मार्चपासून देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला. देशातील करोनाचे रुग्ण आणि सरकारचे निर्णय यासंदर्भात केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून रोज दुपारी ४ वाजता माहिती देण्यात येत आहे. करोनाविरोधी लढाईत सरकार अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करत आहे. क्वारंटाइन केलेल्या रुग्णांवर निरीक्षण ठेवण्यासाठी तसंच अम्ब्युलन्स वेळेत पोहोचण्यासाठी तंत्रज्ञानाची मदत होत आहे, असं आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी सांगितलं.
करोनाच्या रुग्णांसाठी तीन पातळीवर काम सुरू आहे. करोना (कोविड १९) केअर सेंटर, कोविड हेल्थ सेंटर आणि कोविड हॉस्पिटल. कोविड केअर सेंटरमध्ये प्राथमिक लक्षणं दिसणाऱ्यांवर उपचार केले जात आहेत. यासाठी हॉस्टेल्स, शाळा, स्टेडियमचाही उपयोग राज्य सरकारं करू शकतात. तसंच करोनाच्या रुग्णांसाठी वेगळी हॉस्पिटल्स आणि हेल्थ सेंटर निर्माण करावी, अशाही सूचना राज्यांना देण्यात आल्याचं अग्रवाल यांनी सांगितलं.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times