एसटी महामंडळाच्या ताज्या बातम्या: ST Strike : लालपरी अजूनही जागेवरच, आर्थिक संकटातही एसटी कर्मचारी संपावर ठाम – st bus strike news st workers insist on strike even in financial crisis st strike update news
औरंगाबाद : गेल्या चार महिन्यांपासून सुरू असलेल्या एसटी संपावर अद्यापही तोडगा निघू शकलेला नाही. त्यात पाच दिवसांपूर्वी राज्याचे परिवहन मंत्री यांनी पुन्हा एकदा एसटी कर्मचाऱ्यांना कामावर हजर राहण्याचे आवाहन केले होते. मात्र, या पाच दिवसांत औरंगाबाद विभागातील फक्त ७५ कर्मचारी कामावर हजर झाले असून अजूनही ५० टक्क्यांपेक्षा अधिक कर्मचारी संपावर ठाम आहेत.
औरंगाबाद विभागात आतापर्यंत २२९ चालक, २२९ वाहक, २५४ यांत्रिकी कर्मचारी, २५० प्रशासकीय कर्मचारी याप्रमाणे ९५२ कर्माचारी आतापर्यंत कामावर रुजू झाल असून अद्याप १४३२ कर्मचारी संपात कायम आहेत. तर परिवहन मंत्र्यांच्या आवाहनानंतर गेल्या पाच दिवसांत ७५ कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना संपावरून माघार घेण्यासाठीचे शासनाचे सर्व प्रयत्न अपयशी ठरत असल्याचे दिसून येत आहे. सध्या हे प्रकरण न्यायालयात असून न्यायालयाचा अंतिम निकाल येईपर्यंत आम्ही माघार घेणार नसल्याचे संपावर असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे. नाना पटोलेंचे वकील सतीश उके यांच्या घरावर ईडीची धाड; फडणवीसांविरोधातील याचिकेमुळं चर्चेत कर्मचाऱ्यांवर आर्थिक संकट…
संपावर असलेल्या कर्मचाऱ्यांचे वेतन बंद आहे. त्यामुळे एसटी कर्मचारी आर्थिक संकटात सापडले आहे. अशात घर चालवणे सुद्धा अवघड झाले आहेत. मुलांचे शिक्षण आणि औषधं घेणं सुद्धा जमत नसल्याचं अनेक कर्मचाऱ्यांनी ‘मटा’शी बोलताना सांगितलं. त्यामुळे अनेक कर्मचारी आत्महत्यासारखं टोकाचं पाऊल उचलत आहे. त्यामुळे सरकारने एक पाऊल मागे घेत संप मिटवण्यासाठी प्रयत्न करावा अशीही मागणी एसटी कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे.