कोलकाताः करोना व्हायरसने जगभर थैमान घातले आहे. भारतातही करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन घोषित झाला आहे. आता या करोनाचे परिणाम जनमानसावर दिसून येत आहेत. आपल्या बाजूने निर्णय दिला नाही म्हणून कोलकाता हायकोर्टातील एका वकिलाने न्यायमूर्तींना शाप दिला. ‘जा तुम्हाला करोनाची लागण होईल’, असं संतापात वकील न्यायमूर्तींना म्हणाले.

वकिलांच्या वर्तणुकीने नाराज झालेल्या न्यायमूर्तींनी त्यांच्याविरोधात अवमाननेची कारवाई केली. कोर्टाच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवल्याने न्यायमूर्ती दिपांकर दत्ता यांनी वकील विजय अधिकारी यांना खडे बोल सुनावले. यासह वकिलाला १५ दिवसांची अवमानना नोटीसही बजावली.

करोना व्हायरसच्या रोगराईमुळे कोलकाता हायकोर्टात १५ मार्चपासून फक्त अत्यावश्यक प्रकरणांचीच सुनावणी होतेय. २५ मार्चपासून प्रकरणांची सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुरू आहे. पण उन्हाळी सुट्टीनंतर कोर्ट सुरू झाल्यावर या प्रकरणी योग्य खंडपीठासमोर सुनावणी करावी, असं न्यायमूर्तींनी म्हटलंय.

वकिलाच्या पक्षकाराने एका राष्ट्रीयीकृत बँकेचे कर्ज फेडले नव्हते. यामुळे आपल्या पक्षकाराच्या बसच्या लिलावावर स्थगिती द्यावी, अशी मागणी वकिलांनी केली. ही बस १५ जानेवारीला जप्त करण्यात आली होती. पण त्यावेळी या प्रकरणी कोर्टाने तात्काळ सुनावणी नकार दिला. न्यायमूर्ती दत्ता आपला निकाल देऊ लागले त्यावेळी नाराज वकिलांनी त्यांना सतत टोकलं.

मला करोनाची भीती नाही, कोर्टाची प्रतिष्ठ सर्वोच्च

वकिलांनी संयम बाळगावा यासाठी अनेकदा इशारा देण्यात आला. पण त्यांनी त्याकडे लक्ष दिलं नाही. माझं भविष्य अंधकारमय असेल. मला करोना व्हायरसची लागण होईल, असा शपही त्यांनी मला दिल्याचं मी ऐकलं. पण मला भविष्यची चिंता नाही आणि करोनाच्या व्हायरसच्या संसर्गाची भीतीही नाही. पण कोर्टाची प्रतिष्ठा सर्वोच्च आहे आणि ती अबाधित ठेवली पाहिजे. यामुळे वकिलांवर कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी कारवाई केली जाईल, असं न्यामूर्ती दत्ता यांनी स्पष्ट केलं.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here