अहमदनगर : कोपरगाव इथे दहा-पंधरा वर्षाच्या प्रयत्नानंतर साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे तीन महिन्यांपूर्वी कोपरगाव शहरात फटाक्यांच्या आतषबाजीत, ढोल ताशांच्या गजरात जल्लोषात स्वागत करण्यात आलं. हा पुतळा चौथऱ्यावर स्थानापन्न करण्यात आला होता. परंतु, अद्याप लोकार्पण सोहळा बाकी होता. पण अशात एका महिलेने थेट झाकलेला पुतळा खुला केला आहे. या घटनेचा व्हिडिओदेखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पोलिसाची हिम्मत! लग्नाच्या वाढदिवसाला म्हणाला पश्चाताप दिन; सुट्टीचा अर्ज वाचून तुम्हीही हसाल
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या तीन महिन्यांपासून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा लोकार्पणाच्या प्रतिक्षेत होता. मात्र, गेल्या काही दिवसांपासून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्याबाबत शहरात चर्चा होती. त्यातच कोपरगाव शहरातील स्वाती शरद त्रिभुवन या महिलेने कपड्याने झाकलेल्या अवस्थेत असलेला पूर्णाकृती पुतळा खुला केला.

सदर घटना गावात वाऱ्यासारखी पसरली आणि समाजबांधवांनी त्या ठिकाणी जमून विरोध दर्शविला. तसेच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत सदर महिलेला व तिच्या पतीला ताब्यात घेतले. तसेच तेथे जमलेल्या समाज बांधवांनी सदर पुतळा पुन्हा झाकून ठेवला आहे. याबाबत उपस्थित समाजबांधवांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

मित्राच्या लग्नात बेधुंद नाचताना झाली ‘मोठी’ चूक, तरुणाचा लग्न मंडपातचं मृत्यू

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here