इस्लामाबाद, पाकिस्तान :

पाकिस्तानचे पंतप्रधान चहुबाजुंनी घेरले गेलेत. त्यांच्यावर राजीनाम्याचा दबाव वाढतोय. या परिस्थितीला इम्रान खान कधी विरोधकांना, कधी अमेरिकेला आणि कधी लंडनमध्ये बसलेल्या माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांना जबाबदार धरत आहेत. राजकारणात अपयशी ठरलेल्या इम्रान खान यांच्या या परिस्थितीवर मात्र एका व्यक्तीला कोणतंही आश्चर्य वाटत नाही… ती व्यक्ती म्हणजे इम्रान खान यांची दुसरी माजी पत्नी रेहाम खान.

‘इम्रान खान स्वार्थी आणि कृतघ्न’

‘एबीपी न्यूज’शी बोलताना रेहाम खान यांनी आपल्या माजी पतीवर निशाणा साधतानाच पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्यावर कौतुकाची उधळण केलीय.

इम्रान खान यांची खुर्ची वाचणं आता शक्य नाही. त्यांना राजीनामा द्यावाच लागेल. त्यांच्या सरकारकडे बहुमत नाही. पाकिस्तानात महागाईनं उच्चांक गाठलाय. इम्रान खान जबाबदार आहेत. अनेक लोकांनी त्यांना शांततेनं खुर्ची सोडण्याचा सल्ला दिला मात्र ते आपल्या निर्णयावर अडीग राहिले, असं रेहाम खान यांनी म्हटलंय.

इम्रान खान हे अतिशय स्वार्थी आणि कृतघ्न व्यक्ती आहेत. आपला स्वार्थ साधेपर्यंतच ते कोणत्याही व्यक्तीशी निगडीत राहतात. सेनेच्या हातातलं बाहुलं बनण्यासाठी ते तयार झाले याचं कारण म्हणजे पंतप्रधान बनण्याचा हा एकमेव रस्ता त्यांना दिसत होता. निवडणुका लढवून इम्रान खान पंतप्रधान पदावर पोहचलेले नाहीत. २०१८ मध्येही त्यांच्याकडे बहुमत नव्हतं आणि आजही नाही, असं म्हणतानाच इम्रान खान यांच्याविरुद्ध निवडणूक लढण्याची आपली इच्छा नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. राजकारणात यायचंय परंतु, इम्रान खान यांच्याविरुद्ध लढणं ही काही मोठी गोष्ट ठरणार नाही, असा शेलका टोलाही त्यांनी लगावला.

वाचा : Imran Khan Resignation Live: इम्रान खान पंतप्रधानपदाचा राजीनामा देणार?
वाचा : पाकिस्तानात सत्तांतराच्या घडामोडींना वेग, इम्रान खान यांची ‘मन की बात’ रद्द

वाचा : ‘शेवटच्या चेंडूपर्यंत पंतप्रधान इम्रान खान खेळणार, राजीनामा देणार नाही’

‘जनतेनं चार वर्ष सहन केलं’

इम्रान खान यांच्यासोबत राहणं किती कठीण आहे हे लग्नानंतर काही काळातच माझ्या लक्षात आलं होतं. मी केवळ काही महिनेच त्यांना सहन करू शकले. जनतेला मात्र त्यांना चार वर्ष सहन करावं लागलंय, अशी आगपाखडही त्यांनी यावेळी केली. ‘माझ्या प्रार्थनांमुळे जनतेला हिंमत मिळाली. प्रार्थनांसमोर कोणताही जादू-टोना काम करत नाही’, असं म्हणत त्यांनी इम्रान खान यांची सद्य पत्नी बुशरा बीबी यांच्यावरही निशाणा साधला.

द कपिल शर्मा शो‘चा उल्लेख

रेहाम खान यांच्या म्हणण्यानुसार, इम्रान खान चांगले राजनेते नसले तरी ते चांगले अभिनेते आहेत. त्यांना सिनेमे बनवण्याचाही छंद आहे. आता ते क्रिकेट तर खेळू शकत नाहीत परंतु, स्टँड अप कॉमेडी ते चांगल्या पद्धतीनं करू शकतात. ‘द कपिल शर्मा शो’मधील पाजी (नवज्योत सिंग सिद्धू) यांची रिक्त जागा इम्रान खान यांच्यासाठी जुगाड ठरली तर त्यांच्यासाठी रोजगाराची व्यवस्था तयार होईल. पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला नाही तर त्यांचं करिअर इथेच संपुष्टात येईल, असंही रेहाम खान यांनी म्हटलंय.

Vladimir Putin: युक्रेन युद्धात आपल्याच लष्कराकडून पुतीन यांची दिशाभूल, अमेरिकेचा दावा
लष्करसज्जता घटवण्याच्या घोषणेनंतरही रशियाचे युक्रेनवर हल्ले सुरूच
Russia Ukraine War: ‘नरेंद्र मोदी मध्यस्थीसाठी तयार असतील तर…’; युक्रेनच्या मंत्र्यांचं आवाहन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here