मुंबई : बाॅलिवूडच्या ट्रॅजेडी क्वीन महजबीन बानो म्हणजे मीना कुमारी यांनी आजच्या दिवशी या जगाचा निरोप घेतला. ते साल होतं १९७२. आणि मीना कुमारी होत्या ३९ वर्षांच्या. पाकिजा, बैजू बावरा, दिल अपना और प्रित पराई, बहू बेगम असे एव्हरग्रीन सिनेमे त्यांनी दिले. आजही त्यांचा अभिनय स्मरणात आहे. ट्रॅजेडी क्वीन ही उपाधी मिळालेल्या मीना कुमारी व्यक्तिगत आयुष्यातही खूप दु:खी होत्या. त्यांना कधी आयुष्यात प्रेम मिळालं नाही. लग्न झालं पण काही वर्षांनी ते टिकलं नाही. त्या दु:खातून बाहेर पडण्यासाठी त्यांनी दारूची मदत घेतली आणि याच दारूनं त्यांचा घात केला. लिव्हर खराब होऊन खूप लवकर त्यांचा मृत्यू झाला.

माणुकीचं दर्शन! घरगड्याच्या वडिलांचा झाला मृत्यू, सांत्वन करण्यासाठी जॅकी श्रॉफ यांनी गाठलं पुणे

एका रात्रीत झाल्या स्टार
६०च्या दशकात मीना कुमारी नंबर १ अभिनेत्री होत्या. त्यांना सिनेमात घेण्यासाठी दिग्दर्शकांची रांग लागत असे. ३३ वर्षांच्या आपल्या करियरमध्ये त्यांनी ९२ सिनेमे केले. अनेक सिनेमे नुसते हिट झाले नाही, तर हिंदी सिनेसृष्टीत ते मैलाचा दगड ठरले. मीना कुमारी यांनी करियरची सुरुवात ४ वर्षापासून केली. १९५२ मध्ये त्यांनी बैजू बावरा सिनेमात काम केलं आणि एका रात्रीत स्टार झाल्या.

मीना कुमारी

मीना कुमारी यांचे शेवटचे सिनेमे पाकिजा आणि गोमती के किनारे. पाकिजा तुफान चालला. गोमती के किनारे त्यांच्या मृत्यूनंतर रिलीज झाला होता. त्या आजारी पडत होत्या, तशा आपले सिनेमे पूर्ण करायची घाई करत होत्या.

‘भाऊंशिवायच्या आयुष्याचा विचारच करू शकत नाही,’ मिथिला पालकरच्या आजोबांचं निधन

हट्टापुढे काही चालेना
त्यांची तब्येत जास्तच बिघडली तेव्हा त्यांना हाॅस्पिटलमध्ये भर्ती केलं. तेव्हा बाकी सगळे सिनेमे पूर्ण झाले होते. फक्त दुश्मनचं शूटिंग बाकी होतं. त्यांना तसा अंदाज आला होता. निर्मात्यानं सांगितलं की तुम्ही बऱ्या व्हा, मग राहिलेला शाॅट पूर्ण करू. त्यांनी हट्टच केला आणि मग हाॅस्पिटलच्या बेडवरच शेवटचं शूटिंग पार पडलं.

मीना कुमारी

मीना कुमारी नववधूच्या वेशात असा सीन होता. तो हाॅस्पिटलच्या बेडवर घेतला. त्यानंतर काही दिवसांनी त्यांचं निधन झालं. तो सीन त्यांच्या आयुष्यातला शेवटचा सीन ठरला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here