वॉशिंग्टन, अमेरिका :

मूळ भारतीय अमेरिकन खासदार राजा कृष्णमूर्ती यांच्यासहीत १२ हून अधिक खासदारांनी अमेरिकेत १४ एप्रिल हा दिवस ‘राष्ट्रीय शीख दिन‘ (National Sikh Day) म्हणून घोषित केला जावा, अशी मागणी केलीय. याचसंबंधी या खासदारांकडून प्रतिनिधी सभेत एक प्रस्तावही सादर करण्यात आला आहे.

संबंधित प्रस्तावात, अमेरिकेच्या विकासात शीख समुदायाच्या महत्त्वपूर्ण योगदानाला अधोरेखित करतानाच या समुदायाच्या भूमिकेप्रती सन्मान प्रदर्शित करण्यासाठी ‘राष्ट्रीय शीख दिना’ची घोषणा करण्याचं समर्थन करण्यात आलंय.

२८ मार्च रोजी सभागृहात मांडण्यात आलेल्या प्रस्तावाच्या प्रवर्तक खासदार मेरी गेल सॅनलोन आहेत. तर कॅरेन बास, पॉल टोन्को, ब्रायन के फिट्झपॅट्रिक, डॅनियल म्यूज, एरिक स्वालवेल, राजा कृष्णमूर्ती, डोनाल्ड नॉरक्रॉस, अँडी किम, जॉन गारामेंडी, रिचर्ड ई नील, ब्रेंडन एफ बॉयल आणि डेव्हिड जी वालाडाओ हे त्याचे सह-प्रस्तावक आहेत. शीख कॉकस समिती, शीख समन्वय समिती आणि अमेरिकन शीख गुरुद्वारा व्यवस्थापन समिती (AGPC) यांच्याकडून या प्रस्तावाचं स्वागत करण्यात आलंय.

PM Imran Khan: इम्रान खान यांना ‘कपिल शर्मा शो’चाच आसरा, माजी पत्नी रेहाम खान यांचा टोला
Russia Ukraine War: ‘नरेंद्र मोदी मध्यस्थीसाठी तयार असतील तर…’; युक्रेनच्या मंत्र्यांचं आवाहन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here