नवी दिल्ली :केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुरुवारी आसाम, मणिपूर आणि नागालँडमधील वादग्रस्त ‘सशस्त्र दल विशेष अधिकार कायदा‘ (AFSPA) या वादग्रस्त कायद्यासंबंधी मोठी घोषणा केलीय. केंद्र सरकारनं लष्करी कायदा ‘अफस्पा’ अंतर्गत येणारे आसाम, मणिपूर आणि नागालँड या राज्यांतील क्षेत्र घटवण्याचा निर्णय घेतलाय. ही घोषणा खुद्द केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलीय.

नागालँडच्या मोन जिल्ह्यात पॅरा कमांडोच्या नुकत्याच झालेल्या ऑपरेशनमध्ये चुकीच्या ओळखीमुळे अनेक गावकरी ठार झाले होते. तेव्हापासून, आसाम, मणिपूर आणि नागालँडमधील सशस्त्र दल (विशेष अधिकार) कायदा, १९५८ (AFSPA) मागे घेण्याची मागणी केली जात होती.

‘अफस्पा’चा वाद

अशांत क्षेत्रात AFSPA कायद्यांतर्गत सशस्त्र दलांना सार्वजनिक सुव्यवस्था राखण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. एकदा सूचना दिल्यानंतर कायद्याचे उल्लंघन करताना आढळलेल्या व्यक्तीवर बळाचा वापर करण्यास किंवा गोळीबार करण्यास या कायद्यान्वये परवानगी देण्यात आलीय. या कायद्यामुळे सशस्र दलाला ‘अमर्याद’ अधिकार देण्यात आल्याची टीका करत त्याला आक्षेप घेण्यात आला होता.

Russia Ukraine War: ‘नरेंद्र मोदी मध्यस्थीसाठी तयार असतील तर…’; युक्रेनच्या मंत्र्यांचं आवाहन
Sheikh Rasheed Ahmad: कसाबचा पत्ता भारताला कसा मिळाला?; पाकच्या गृहमंत्र्याने केला मोठा दावा
या कायद्यामुळे सशस्र दलाला कोणत्याही वॉरंटशिवाय एखाद्या व्यक्ती अटक करण्याचा, एखाद्या परिसरात प्रवेश करण्याचा आणि झाडाझडती घेण्याची परवानगी मिळते.

जम्मू आणि काश्मीर व्यतिरिक्त नागालँड, आसाम, मणिपूर (इंफाळचे सात विधानसभा मतदारसंघ वगळता) आणि अरुणाचल प्रदेशच्या काही भागांत हा वादग्रस्त कायदा लागू आहे. त्रिपुरा आणि मेघालयचा काही भाग यादीतून वगळण्यात आला आहे.

‘अशांत क्षेत्र’ घोषित करण्याचा अधिकार केंद्राकडे

नागरिकांच्या मदतीसाठी सशस्र दलांचा वापर आवश्यक असेल अशा ठिकाणांना ‘अशांत क्षेत्र’ म्हणून चिन्हीत केलं जातं. ‘अफस्पा’ कायद्याच्या कलम ३ नुसार, कोणत्याही धार्मिक, वांशिक, भाषा किंवा प्रादेशिक गट, जाती किंवा समुदायातील सदस्यांमधील मतभेद किंवा विवादांमुळे कोणतंही क्षेत्र ‘अशांत क्षेत्र’ म्हणून घोषित केलं जाऊ शकतं. एखाद्या क्षेत्राला ‘अशांत क्षेत्र’ म्हणून घोषित करण्याचा अधिकार सुरुवातीला राज्यांकडे होता, मात्र १९७२ मध्ये हा अधिकार केंद्रानं आपल्याकडे घेतला होता.

PM Imran Khan: इम्रान खान यांना ‘कपिल शर्मा शो’चाच आसरा, माजी पत्नी रेहाम खान यांचा टोला
Vladimir Putin: युक्रेन युद्धात आपल्याच लष्कराकडून पुतीन यांची दिशाभूल, अमेरिकेचा दावा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here