१२वीत असताना ते संपूर्ण वर्ष माझ्यासाठी लॉकडाऊनसारखच होतं. घरातच्या एका खोलीत मी स्वतःला जवळपास वर्षभूर बंद करून घेतलं होतं. यादरम्यान मी आयआयटीची तयारी करत होतो, असं अरविंद केजरीवाल यांनी सांगितलं. अनुनव नावाच्या एका विद्यार्थ्याने ट्विटरवरून केजरीवाल यांना प्रश्न विचारला होता. लॉकडाऊनमधील वेळेचा सदुपयोग कसा करावा? असा प्रश्न विद्यार्थ्याने केजरीवालांना केला होता. लॉकडाऊन दरम्यान संपूर्ण एकाग्रतेने अभ्यास करा, असंही केजरीवाल विद्यार्थ्याला म्हणाले.
सर्व शाळा बंद, ऑनलाइन अभ्यासक्रम सुरू
लॉकडाऊनमुळे सर्व शाळा बंद आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान होतंय. हे नुकसान भरून काढण्यासाठी ऑनलाइन शिक्षण सुरू झालं आहे. दिल्ली सरकारने आपल्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारचे ऑनलाइन अभ्यासक्रम सुरू केला आहे. दिल्ली सरकारप्रमाणेच सीबीएसई आणि मनुष्यबळ विकास मंत्रालयानेही ऑनलाइन अभ्यासक्रमाद्वारे विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरळीत सुरू रहण्यासाठी प्रयत्न केलेत.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times