जिनेवा : जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) बुधवारी करोना प्रादुर्भासंदर्भात महत्वपूर्ण आकडेवारी जाहीर केली आहे. गेल्या काही दिवसांत करोना रुग्णसंख्येत काही प्रमाणात घसरण झाली असली तरी या विषाणूची बाधा होऊन झालेल्या मृत्यूंच्या संख्येत मात्र ४० टक्क्यांनी वाढ झाली असल्याचं ‘डब्ल्यूएचओ’च्या आकडेवारीतून स्पष्ट झालं आहे. (Who On Coronavirus Cases)

या आकडेवारीनुसार, आठवड्याभरात जगात जवळपास १ कोटी लोकांना कोविड-१९ विषाणूची बाधा झाली आहे, तर ४५ हजारांपेक्षा जास्त रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. याआधीच्या आठवड्यात मात्र करोनामुळे झालेल्या मृत्यूच्या संख्येत २३ टक्क्यांची घट नोंदवण्यात आली होती. चीन आणि अमेरिकेत झालेल्या रुग्णवाढीमुळे आता करोनाच्या मृत्यूदरात वाढ होत असल्याचं सांगण्यात येत आहे.

st strike news : अल्टिमेटम संपण्यात… ‘संपकरी एसटी कर्मचारी आता अतिरेक करताहेत’, शिवसेनेच्या मंत्र्याचा इशारा

महाराष्ट्रातील मृत्यूसंख्येचा केला समावेश

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांत करोना प्रादुर्भाव आटोक्यात आलेला दिसत आहे. मात्र याआधी राज्यात जवळपास ४ हजार करोना रुग्णांनी जीव गमावला होता, जी संख्या जागतिक आरोग्य संख्येच्या आधीच्या आठवड्यातील आकडेवारीत ग्राह्य धरण्यात आली नव्हती. नव्या आकडेवारीत ही संख्या घेतल्याने एकूण मृत्यूसंख्या जास्त दिसत असल्याची माहिती आहे.

भारतात काय आहे करोनाची स्थिती?

गेल्या २४ तासांत देशात १ हजार २२५ नव्या कोविडग्रस्त रुग्णांची नोंद झाली. देशभरात कोविड बाधितांच्या संख्येत घसरण होण्याचा कल कायम ठेवत भारतातील कोविड सक्रीय रुग्णसंख्या आता कमी होऊन १४ हजार ३०७ झाली आहे, देशातील आतापर्यंतच्या एकूण कोविड बाधितांच्या तुलनेत ही सख्या केवळ ०.०३ टक्के आहे. भारतातील रोगमुक्ती दर आता ९८.७६ टक्के झाला आहे. गेल्या २४ तासांत १ हजार ५९४ रुग्ण कोविड आजारातून बरे झाल्यामुळे देशात महामारीची सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत कोविड-१९ आजारातून पूर्णपणे बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या आता ४,२४,८९,००४ इतकी झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here