मुंबई : दिवंगत अभिनेता ऋषी कपूर यांचा अखेरचा सिनेमा शर्माजी नमकीन ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला आहे. हा सिनेमा रिलीज झाल्यानंतर तो पाहण्यासाठी संपूर्ण कपूर कुटुंब जमलं होतं. यामध्ये ऋषी कपूर यांचा मोठा भाऊ रणधीर यांचा देखील समावेश होता. सिनेमा पाहिल्यानंतर रणधीर कपूर यांनी मोठा धक्काच दिला.


ऋषी कपूर यांना भेटायची इच्छा
रणबीर कपूरनं अलिकडेच एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितलं की, ‘रणधीर कपूर यांनी शर्माजी नमकीन हा सिनेमा पाहिला. त्यानंतर त्यांनी मला सांगितलं की,ऋषीला फोन लाव. मला त्याच्याशी बोलायचं आहे. त्याचं कौतुक करायचं आहे. ऋषीनं या सिनेमात अप्रतिम काम केलं आहे, हे मला त्याला सांगायचं आहे.त्याला बोलव. मला बोलायचं आहे त्याच्याशी…’ रणबीरनं याच मुलाखतीमध्ये रणधीर यांना डिमेंशिया आजार झाल्याचंही सांगितलं. वास्तविक हा ऋषी यांचा शेवटचा सिनेमा. त्यांनी २९ एप्रिल २०२० रोजी जगाचा निरोप घेतला.

जॉन अब्राहमचा ‘अटॅक’; म्हणाला ‘प्रादेशिक सिनेमे करणार नाही’

रणधीर म्हणाले होते सर्व काही संपलं

कपूर भावंडं

रणधीर कपूर यांनी ई-टाइम्सला दिलेल्या एका जुन्या मुलाखतीमध्ये दोन्ही भावांना गमवल्याबद्दलचं दुःख व्यक्त केलं होतं. त्यांनी पुढं सांगितलं की, ‘गेलं वर्ष माझ्या आयुष्यातील अत्यंत वाईट होतं. गेल्या १० महिन्यांत मी चिंटू आणि चिंपू या दोन्ही लाडक्या भावांना गमावलं आहे. केवळ इतकंच नाही तर गेल्या काही वर्षांत माझी आई, बहीणही जग सोडून गेल्या. आम्ही तीन भाऊ आणि दोन्ही बहिणी एकमेकांच्या खूप जवळ होतो. चिंटू, चिंपू आणि मी रोज एकमेकांशी बोलायचो. चिंपू माझ्याबरोबर रहायचा. जेव्हा चिंटू शूटिंगमध्ये नसायचा तेव्हा ऑफिसमध्ये यायचा आणि माझ्याशी सतत संपर्कात असायचा. जेव्हा आम्ही तिघं असायचो तेव्हा आम्हाला कुणाचीच गरज नव्हती. आम्ही आमच्या आयुष्यात सुखी होतो. परंतु आता हे सर्व काही संपलं आहे.’

घरगड्याच्या सांत्वन करण्यासाठी जॅकी श्रॉफ यांनी गाठलं पुणे

ऋषी कपूर यांच्या निधनानंतर परेश रावल यांनी त्यांचा अपूर्ण राहिलेला ‘शर्माजी नमकीन’ हा सिनेमा पूर्ण केला. या सिनेमात ऋषी आणि परेश यांनी अत्यंत उत्तम काम केलं आहे. हा सिनेमा ३१ मार्च रोजी अमेझॉन प्राइमवर रिलीज झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here