इस्लामाबाद: पाकिस्तानमध्ये इम्रान खान यांचे सरकार धोक्यात आल्यामुळे वेगवान राजकीय घडामोडी सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांनी गुरुवारी पाकिस्तानी जनतेला संबोधित केले. यावेळी इम्रान खान यांनी भारतीय पत्रकार बरखा दत्त यांच्या पुस्तकाचा दाखला देत एक खळबळजनक गौप्यस्फोट केला. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यावर देशातून परागंदा होण्याची वेळ आली होती तेव्हा ते नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना भेटत होते. पाकिस्तानी लष्करापासून वाचण्यासाठी नवाज शरीफ नेपाळमध्ये लपुनछपून पंतप्रधान मोदी यांना भेटायचे, असा उल्लेख बरखा दत्त यांच्या पुस्तकात असल्याचे इम्रान खान यांनी सांगितले. इम्रान खान यांच्या या वक्तव्यामुळे आता देशात आता राजकारण रंगण्याची शक्यता आहे. (political crisis in Pakistan)
Imran Khan: इम्रानची खुर्ची वाचवण्यासाठी धडपड; काश्मीरबाबत जुना राग, मोदी-शरीफ गुप्त भेटींचा दावा
नरेंद्र मोदी यांनी राहील शरीफ आणि पाकिस्तानी लष्कप्रमुखांना दहशतवादाचे पुरस्कर्ते म्हटले होते. मात्र, नरेंद्र मोदी यांना असेच लोक आवडतात. मी असा पाकिस्तानी आहे की, ज्याला भारतातील बहुतांश लोक ओळखतात. भारतामधील लोकांशी माझी मैत्री होती. मी अमेरिकेतील नेत्यांनाही चांगल्याप्रकारे ओळखतो. इंग्लंड तर माझ्यासाठी दुसऱ्या घराप्रमाणे आहे. त्यामुळे मी या देशांविरोधात जाऊच शकत नाही. पण या देशांची जी धोरणे चुकीची आहेत,त्यावर मी टीका करतो, असे इम्रान खान यांनी स्पष्ट केले.

आपल्या भाषणात इम्रान खान यांनी अमेरिकेवर अनेक आरोप केले. पाकिस्तानमधील काही कलंकित नेत्यांना अमेरिका पुन्हा सत्तेवर बसवू पाहत आहे. मी रशियाच्या दौऱ्यावर गेलो तेव्हा अमेरिकेने पाकिस्तानशी संबंध तोडून टाकायची धमकी दिली होती, असा खुलासाही इम्रान खान यांनी केला.

‘पद वाचवायचं असेल तर…’ लष्कराकडून पंतप्रधान इम्रान खान यांना मोठी ऑफर
इम्रान खान यांच्या पंतप्रधानपदाचा फैसला उद्या होणार

सहकारी पक्षांनी पाठिंबा काढून घेतल्यामुळे इम्रान खान यांचे सरकार अल्पमतात आले आहे. पाकिस्तानी संसदेत रविवारी सरकारविरोधात अविश्वास ठराव मांडला जाणार आहे. यावेळी इम्रान खान यांच्या सरकारपुढे बहुमत सिद्ध करण्याचे जिकीरीचे आव्हान आहे. विरोधक माझ्यावर पंतप्रधानपदाचा राजीनामा देण्यासाठी दबाव आणत आहेत. मात्र, मी शेवटपर्यंत हार मानणार नाही, असा निर्धार इम्रान खान यांनी व्यक्त केला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here