Pune Dehu News Update : पुण्यातील देहूत आजपासून पुन्हा एकदा मांस, मच्छी विक्रीस (Non Veg) बंदी घालण्यात आली आहे. संत तुकाराम महाराजांची ही नगरी असल्यानं तसा निर्णय नगरपरिषदेने घेतला. याआधी ग्रामपंचायत असताना ही त्याची अंमलबजावणी सुरू होती. त्यानंतर नवनिर्मित देहू नगरपरिषदेच्या पहिल्याच सर्व साधारणसभेत हा निर्णय घेतला. जानेवारीत एकमुखाने मंजुरी दिलेल्या ठरावाची आजपासून अंमलबजावणी सुरू झाली आहे. याआधी ग्रामपंचायतीने सुद्धा हा निर्णय घेतला होता. मात्र ग्रामपंचायत बरखास्त झाली आणि कोरोनाचाही काळ सुरू झाला.

त्यामुळे प्रशासक असताना मांस, मच्छी, अंडी विक्री सुरू झाली. पण ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपरिषदेत झाले, जानेवारीत निवडणूकही झाली. त्यानंतरच्या पहिल्याच सर्वसाधारणसभेत पुन्हा एकदा मांस, मच्छी, अंडी विक्रीवर बंदीचा निर्णय झाला. एकमताने मंजूर झालेल्या ठरावाची आजपासून अंमलबजावणी सुरू झाली.

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह – ABP Majha

महत्त्वाच्या इतर बातम्या :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here