Satish Ukey | सतीश उके हे नागपूरमधील प्रसिद्ध वकील आहेत. ईडीने त्यांच्यावर कारवाई केल्याने अनेकांकडून आश्चर्य व्यक्त होत आहे. हा तपास आता कोणत्या दिशेने जाणार, हे पाहावे लागेल.

हायलाइट्स:
- ईडीच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी पहाटे साडेपाच वाजता सतीश उके यांच्या नागपूरातील घरावर छापा टाकला होता
- ईडीने सतीश उके यांचा लॅपटॉप, मोबाईल आणि काही कागदपत्रे ताब्यात घेतल्याचे समजते
रवी जाधव शुक्रवारी सकाळी उकेंना भेटण्यासाठी ईडीच्या कार्यालयात गेले होते. मात्र, तेव्हा ईडीने आम्ही सतीश उके यांना न्यायालयात हजर करणार असल्याचे सांगितले. मात्र, काहीवेळातच त्यांना ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी आणण्यात आले. ईडीने आमची दिशाभूल केली. मला सतीश उके यांना भेटून दिले जात नाही. हे माझ्या अशिलाच्या मुलभूत अधिकाराचे उल्लंघन आहे, असा आरोप वकील रवी जाधव यांनी केला. यानंतर आता रवी जाधव पुन्हा एकदा सतीश उके यांना भेटण्याचा प्रयत्न करणार आहेत. मात्र, ईडीचे अधिकारी त्यासाठी परवानगी देतात का, हे पाहावे लागेल.
फडणवीसांविरोधात याचिका करणाऱ्या वकील सतीश उके ईडीच्या ताब्यात
ईडीच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी पहाटे साडेपाच वाजता सतीश उके यांच्या नागपूरातील घरावर छापा टाकला होता. यावेळी ईडीने सतीश उके यांचा लॅपटॉप, मोबाईल आणि काही कागदपत्रे ताब्यात घेतल्याचे समजते. ईडीने सतीश उके यांना नक्की कोणत्या प्रकरणात अटक केली आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. सतीश उके हे नागपूरसह राज्यात चर्चेत असलेले नाव आहे. आतापर्यंत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक भाजप नेत्यांवर जाहीरपणे आरोप केले आहेत. त्यामुळे सतीश उके यांच्यावरील ईडीच्या कारवाईचे अनेक अर्थ काढले जात आहेत.
काँग्रेस पक्षाच्या जवळचे म्हणून सतीश उके यांचा लौकिक आहे. सतीश उके यांनी आतापर्यंत अनेक भाजप नेत्यांना अंगावर घेतले आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याविरोधातही सतीश उके न्यायालयात याचिका दाखल केली होती. २०१४ च्या निवडणुकीवेळी प्रतिज्ञापत्र सादर करताना देवेंद्र फडणवीस यांनी दोन गुन्ह्यांची माहिती लपवल्याचा आरोप सतीश उके यांनी केला होता. हे प्रकरण बरेच गाजले होते.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
या बातम्यांबद्दल अधिक वाचा
Marathi News from Maharashtra Times, TIL Network