मुंबई: लखनौ सुपर जायंट्स संघाने आयपीएल २०२२च्या सातव्या लढतीत चेन्नई सुपर किंग्जवर धमाकेदार विजय मिळवला. गतविजेते चेन्नईने २११ धावांचे आव्हान दिले होते. कर्णधार केएल राहुल आणि क्विंटन डीकॉक यांनी जबरदस्त सुरुवात करून दिल्यानंतर लखनौच्या एका पाठोपाठ एक विकेट पडल्या. पण एविन लुईसने २३ चेंडूत ६ चौकार आणि ३ षटकारांसह ५५ धावा करत सामना फिरवला. यात आयुष बदोनीच्या ९ चेंडूतील १९ धावांचे योगदान देखील होते.

वाचा-

कुठे चुकले सीएसके?

कर्णधार रविंद्र जडेजा आणि माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीने १९वे षटक शिवब दुबेला देण्याचा निर्णय घेता. या षटकात २ षटकार आणि २ चौकारांसह एकूण २५ धावा केल्या. एविन लुईस आणि आयुष बदोनी यांनी एका षटकात सामन्याचे चित्र पालटले. तोपर्यंत लढत चेन्नईच्या बाजूने झुकली होती. यामुळे अखेरच्या षटकात लखनौला विजयासाठी ९ धावांचे टार्गेट शिल्लक राहिले. २०व्या षटकात आयुषने मुकेश चौधरीला षटकार मारून विजय निश्चित केला. धोनी आणि जडेजा यांचा दुबेला ओव्हर देण्याचा एक निर्णय चुकीचा ठरला.

वाचा-

त्याआधी राहुल आणि डी कॉक यांनी लखनौला जबरदस्त सुरूवात करून दिली. त्यांनी पॉवर प्ले मध्ये विकेट न गमावता ५५ धावा केल्या. त्यानंतर ९९ धावांची भागिदार करून विजयाचा पाया रचला. डी कॉकने ३४ चेंडूत अर्धशतक तर लुईसने फक्त २३ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. लखनौला अखेरच्या ३० चेंडूत ६७ धावांची गरज होती. लुईससोबत आधी दीपक हुड्डा आणि नंतर आयुषने विजयाचे लक्ष्य पार करून दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here